मोदीजी, बँकांना सांगा पैसे परत घ्या- विजय माल्ल्या

4

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदूस्थानातील बँकांचे 9 हजार कोटीं रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला फरार झालेल्या विजय माल्ल्याचे चांगेच धाबे दणाणले आहेत. गुरुवारी माल्ल्याने ट्विट करून बँकांना उरलेले पैसे परत घेण्याचे आवाहन केले आहे. लोकसभेतील पंतप्रधान मोदींच्या शेवटच्या भाषणानंतर माल्ल्याने हे ट्विट केले आहे. ब्रिटिश सरकारने माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजूरी दिल्यानंतर त्याची चांगलीच भंबेरी उडाली आहे. त्यामुळे एकामागून एक ट्विट करून माल्ल्याने हिंदुस्थानच्या सरकारला पैसे परत घेण्याचे आवाहन केले आहे.

माल्ल्याने पहिले ट्विट करून म्हटले आहे की, “पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात नाव न घेता एक व्यक्ती 9 हजार कोटी रुपये घेऊन पळाल्याचा उल्लेख केला. पण प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या बातम्यांनूसार मला अंदाज आहे, की त्यांचा रोख माझ्याकडेच आहे”. असे म्हटले आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने पंतप्रधानांना प्रश्न केला आहे. “माझ्या अगोदरच्या ट्विटनंतर मला पंतप्रधानांना आग्रहपुर्वक विचारायचे आहे की, ते बँकांना माझ्याकडून पैसे घेण्यासाठी आदेश का देत नाहीत? जेव्हा कि, मी जनतेचे घेतलेले सर्व पैसे परत करण्यासाठी इच्छुक आहे”.

विजय माल्ल्या जस जसा कायद्याच्या कचाट्यात अडकत आहे तशी त्याची भंबेरी उडताना दिसत आहे. कारण एका मागून एक असे ट्विट करून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे. “आपण उर्वरीत रक्कम परत करण्याची ऑफर कर्नाटक उच्च न्यायालयासमोर ठेवली आहे. ती तूम्ही धुडकावू शकत नाही”, ही पुर्णपणे वास्तविक, गंभीर आणि इमानदारीने दिलेली ऑफर असल्याचे माल्ल्याने म्हटले आहे.