सहजीवनी या… जन्मोजन्मीचं नातं


>> विजय पालवे

 माझी जोडीदार :

वंदना विजय पालवे.

लग्नाचा वाढदिवस :

6 डिसेंबर 1988.

आठवणीतला सर्वात चांगला क्षण :

मुलगा झाला तो क्षण. 13 नोव्हेंबर 1989.  

तिचा आवडता पदार्थ  :

पनीर तिखा.

एखादा तिच्याच हातचा पदार्थ :

सगळंच रुचकर बनवते, पण मांसाहारी पदार्थ खूपच चवदार बनवते.  

तिला राग आल्यावर :

आम्ही सर्वजण घरात शांत राहतो.  

तिची गंमत करायची असल्यास :

तिला सरप्राईज वस्तू देण्याअगोदर चिडवणे.  

तिची आवड :

वर्षातून एकदा तरी सहलीला जाणे तिला खूप आवडते. तिची ती इच्छा मी पूर्ण करतो.  

तिच्यासाठी एखादी गाण्याची ओळ :

पल पल दिल के पास तुम रहती हो।  

तुमच्या आयुष्यात तिचे स्थान :

मैत्रीण व पत्नी म्हणून जन्मोजन्मी हीच मिळावी.  

कठीण प्रसंगात तिची साथ :

जीवनात येणार्‍या बर्‍याच अडचणींत ठामपणे माझ्या पाठीशी उभी राहून साथ दिल्यामुळे मी कठीण प्रसंगावर मात करत गेलो.  

आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट :

तिने माझ्या आईला, कुटुंबाला सांभाळून घेतले व माझ्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. तिच्या साथीमुळेच ते घडू शकले. माझ्या मोठ्या मुलाला अमेरिकेला पाठविण्यात तिचीच साथ होती. आतापर्यंत तुझी साथ होती  तशीच कायम राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

 

आपला जोडीदार… त्याची अनेक वर्षांची मोलाची साथ. अनेक गोड, तिखट आठवणींना उजाळा देणारं… आणि पती-पत्नी या नात्यातील भावबंध दृढ करणारं सदर… आपणही आपल्या जगण्यातील मान्यवरच असतो. तेव्हा जोडीदाराविषयीच्या नाजूक भावना मांडा छायाचित्रासहित या सदरामध्ये… या प्रश्नांच्या चौकटीत… सुंदर, तरल भावनांना प्रसिद्धी दिली जाईल.

 

आमचा पत्ता : आनंदाचं झाड, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] वरही पाठवता येईल.