विजया ताहिलरामानी मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती

सामना प्रतिनिधी, मुंबई

न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामानी यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक केली आहे. त्यांनी आज तामीळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडून पदाची शपथ घेतली. तर मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. विजया कापसे ताहिलरामानी यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी बढती मिळाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्या. विजया ताहिलरामानी यांची शिफारस मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी केली होती. तर मूळचे मुशिराबाद (ता. लातूर) येथील न्या. नरेश पाटील हे ऑक्टोबर २००१पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी कार्यरत आहेत. न्या. विजया ताहिलरामानी या मद्रास उच्च न्यायालयाच्या तिसऱया महिला मुख्य न्यायमूर्ती आहेत.