विक्रम गोखले आता पुढाऱ्याच्या भूमिकेत

राठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही अभिनय कौशल्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले लवकरच ‘राष्ट्र’ या मराठी सिनेमात पुढाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनलच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शनासोबतच त्याच्या लेखन आणि संकलनाची जबाबदारी इंदरपाल सिंग यांनी सांभाळली आहे. इथल्या लाल मातीच्या राजकारणातील बारकावे अभ्यासपूर्ण शैलीत मांडत त्यांनी रुपेरी पडद्यावर राजकारणाच्या बुद्धीबळाचा डाव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

गोखले यांची वेशभूषा भगवी असली तरी ही भूमिका कोणत्याही राजकीय पक्षाशी साम्य दाखवणार नाही असे इंदरपाल म्हणाले. यात मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रीमा लागू, संजय नार्वेकर, दिपक शिर्वâे आणि गणेश यादव यांच्या भूमिकाही यात पाहायला मिळतील.