गाव तसं चांगलं पण रस्त्यावर उतरलं, कशासाठी ते वाचा

85

सामना ऑनलाईन, बीड

गावातील हेव्यादाव्यांमुळे विकासकामं होत नाही असं अनेक गावांमध्ये बघायला मिळतं. मात्र बीड जिल्ह्यातील एक गाव असं आहे जे एका मागणीसाठी  एकत्र होऊन आंदोलनात उतरलं आहे. हे आंदोलन सुरू आहे ते पिंपळनेर तालुका व्हावा या मागणीसाठी. बीड शहरापासून २२ कि.मी.अंतरावर असलेल्या पिंपळनेरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी अख्ख्या गावाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह इतर पक्षांनीही पाठींबा दिला आहे.

बीड तालुक्यातील पिंपळनेर हा भाग स्वातंत्र्यसैनिकांची भूमी म्हणून ओळखलं जातं. मात्र या गावासह आसपासच्या किमान ४५ गावांचा विकास झालेला नाही. या गावांचा विकास करायचा असेल तर पिंपळनेरला तालुका दर्जा द्यावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली ज्याला आसपासच्या गावांचाही पाठिंबा मिळाला. ही मागणी गेल्या पंचवीस वर्षांपासून केली जात आहे, मात्र दरवेळी या मागणीला बगल दिली जाते. यावेळी पिंपळनेरला तालुका दर्जा मिळवायचाच या उद्देशाने ग्रामस्थ पेटून उटले असून यातूनच हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे या आंदोलनात सहभागी झाले असून काकू-नाना आघाडीच्या वतीने संदीप क्षीरसागर यांनीही या  आंदोलनाला पाठींबा दिला आहे

आपली प्रतिक्रिया द्या