माणगांव – ढोलकरवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

सामना प्रतिनिधी । कुडाळ

माणगांव ढोलकरवाडी येथील सुनील राजाराम सावंत यांच्यासह माणगाव ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. माणगाव ढोलकरवाडीतील विठ्ठल मंदिर येथे हा प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

आ. वैभव नाईक यांनी माणगावातील प्रलंबित विकास कामांची माहिती घेत येत्या काळात माणगाव येथे सभामंडप, स्ट्रीट लाईट, माणगाव स्मशानभूमी ही प्रलंबित कामे येणाऱ्या दोन तीन महिन्यात पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी जि. प. सदस्य राजेश कविटकर, पं. स. सदस्या सौ. शरयू घाडी, पं. स. सदस्या सौ. मथुरा राऊळ, माजी उपसभापती बबन बोभाटे, सुनील इम्ब्राहीमपूरकर, मोहन राणे, भाई मुंज , बाळा जोशी कृष्णा धुरी, रमाकांत धुरी, संजय धुरी, वैभव परब, पप्पू ताम्हणेकर आदी उपस्थित होते.