सायकल, एक सर्वांगसुंदर व्यायाम

विनोद पाष्टे, सायकलपटू

मुंबईत नुकतेच महापालिकेतर्फे सायकल ट्रक सुरू करण्यात आला आहे. सायकल एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार. आपल्यापैकी प्रत्येकाने या सुविधेचा लाभ घ्यायला हवा.

सायकल चालवल्याने पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि अनेक आजार दूर होतों. त्यामुळे तुमच्या व्यस्त जीवनशैलीतून सायकलिंगसाठी थोडा वेळ काढा आणि आरोग्य निरोगी ठेवा.

सायकलिंग हे लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत कोणीही करू शकतं. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार सायकलिंग करता येते. स्नायूंची ताकद आणि लवचीकता राखून ठेवण्यासाठी सायकलिंग फायदेशीर ठरते तसेच शारीरिक हालचाल चांगली झाल्याने तणावापासून दूर राहतो. हाडांच्या बळकटीसाठी सायकलिंग चांगला पर्याय आहे. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी त्याची मदत होते. सायकलिंगमुळे शारीरिक हालचाली कुठल्या ना कुठल्या माध्यमातून होत असल्याने आजारांपासून दूर राहता येते. मधुमेह हा आजार सायकलिंगमुळे थांबवू शकत नाही, पण त्यावर नियंत्रण राखू शकतो. मधुमेहींनी सायकल चालवल्यावर त्यांच्या कॅलरीज खर्च होऊन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. ज्यांना व्यायामशाळेत जायला आवडत नाही त्यांनी सायकल चालवण्याकडे लक्ष द्यावे.  सायकलिंगमुळे शारीरिक हालचाल होते, हृदय चांगले काम करते,रक्ताभिसरणही सुरळीत होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

सायकल चालवण्याचे दोन प्रकार आहेत. इनडोअर सायकलिंग आणि आऊटडोअर सायकलिंग. इनडोअर सायकलिंगमध्ये सायकलिंगचे तीन प्रकार येतात. रिकमेण्ड बाईक, अपराईट बाईक, तिसरी येते स्पिन बाईक.रिकमेण्ड बाईक असते त्याला पाठीला आधार मिळतो. अपराईटला पाठीला आधार नसतो.  एकाच स्थितीत बसल्याने पाठीला बाक येत नाही. स्पिनिंग ही सायकल त्यांच्यासाठी आहे ज्यांना सायकल फार आवडते, ज्यांना खूप जास्त कॅलरीज बर्न करायच्या आहेत. ही सायकलिंग एका स्पिनर प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली होते.  तर आऊटडोअर सायकलिंगमुळे स्नायूंना बळकटी येते. एका तासापेक्षा जास्त सायकलिंग करता तिथे मसल्स लॉस होणार आहे. त्यांनी प्रथिने जास्त प्रमाणात खावीत.

कोणीही व्यक्ती सायकलिंग करू शकते. कार्डिओ ऑक्टिव्हिटीला तीन भागांत विभागतो. ‘एक वेट बेअरिंग आणि इम्पॅक्ट बेस मूव्हमेण्ट’ जिथे तुम्ही स्वतःचे वजन सावरायचे असते आणि त्याचा इम्पॅक्ट पण असतो. जेव्हा आपण धावतो तेव्हा स्वतःचे वजन सोबत घेऊन धावत असतो. पळताना दोन्ही पाय हवेत असतात तेव्हा एक पाय जमिनीवर आणि एक पाय हवेत असतो. त्यावेळी गुडघ्यावर दाब येतो. गुडघ्याला दुखापत असेल त्यांनी हा व्यायाम करू नये. दुसरा व्यायाम ‘वेट बेअरिंग पण नॉन इम्पॅक्ट बेस मूव्हमेण्ट.’ चालणे किंवा व्यायामशाळेत क्रॉस ट्रेडर्स येतात. क्रॉस ट्रेडर्समध्ये पाय नेहमी जमिनीवर असतात. पाय उचलून आपटत नाही तिथे इम्पॅक्ट कमी असतो, पण वेट बेअरिंग आहे. कारण तुम्ही तुमचे वजन सांभाळत असतात. तिसरा व्यायाम ‘नॉन वेट बेअरिंग आणि नॉन इम्पॅक्ट बेस मूव्हमेण्ट’ जिथे तुम्ही स्वतःचे वजनही सांभाळावे लागत नाही आणि इम्पॅक्टही नाही. त्या हालचालीला सायकलिंग म्हणतात. सगळ्यात सोपा व्यायाम प्रकार आहे.

सायकल ट्रॅक

> एअर इंडिया मुख्यालय (मरीन ड्राइव्ह ) ते गिरगाव चौपाटी या पाच कि.मी. रस्त्यावर सायकलसाठी स्वतंत्र मार्गिका आहे.

> परळ भोईवाडा परिसरात बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र संघर्ष मनोरंजन मैदानात १ किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या व १.२ मीटर रुंदीच्या सायकल ट्रकचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

सायकलिंगचे फायदे

> ताकद वाढते.

> ताणतणाव कमी होण्यास मदत होते.

> हृदयाची क्षमता वाढते.

> अतिरिक्त चरबी कमी होते.

> रोगप्रतिकारशक्ती वाढते.

> शरीर कार्यक्षम राहते.

> मधुमेहींना आराम मिळतो.

> स्नायूंना बळकटी मिळते.

> बुद्धी तल्लख होते.

> सर्दी, खोकल्यासारखे व्हायरल आजार होत नाहीत.

 सायकलिंग करताना

> वाहतूककोंडीमध्ये सायकल चालवू नये.

> अंधारात सायकल चालवणे टाळावे.

> रिफ्लेक्टर जॅकेट वापरा.

> सायकलला टेल लॅम्प लावा.