विराट कोहली पाकिस्तानात का विकतोय पिझ्झा?

2

सामना ऑनलाईन । कराची

बातमीचा मथळा वाचून चक्रावून गेला असाल ना… पण, विराट पाकिस्तानातल्या एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा बनवत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट आणि पाकिस्तानमधल्या पिझ्झाचा काय संबंध.. असं तुम्हाला नक्की वाटलं असेल. पण थांबा.. हा विराट खराखुरा नसून हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा एक तरुण आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ कराची इथला असून तिथे पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये काम करणारा कर्मचारी हुबेहूब हिंदुस्थानी क्रिकेटपटू विराट कोहलीसारखा दिसतो. या तरुणाकडे पाहिल्यानंतर विराटला पाहिल्याचा भास होतो. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहे.

पाहा पाकिस्तानातल्या विराटचा व्हिडिओ-