कोहली कॅप्टन ऑफ द इअर, अश्विन क्रिकेटर ऑफ द इअर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसीने २०१६ या वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या सर्व क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेऊन विराट कोहलीची कॅप्टन ऑफ द इअर (एकदिवसीय क्रिकेट) आणि रविचंद्रन अश्विनची क्रिकेटर ऑफ द इअर (सर्व प्रकारचे क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट) म्हणून निवड केली आहे. कसोटीमध्ये धावांचा पाऊस पाडूनही कोहलीची आयसीसीने कसोटी क्रिकेट संघात निवड केलेली नाही.

आयसीसीने निवडलेल्या एकदिवसीय क्रिकेट संघात कोहलीची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. कोहली व्यतिरिक्त फलंदाज रोहित शर्मा आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाचीही निवड करण्यात आली आहे. संघात हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाचे ३-३, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे १-१ खेळाडू आहे. या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या ४ क्रिकेटपटूंचीही आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट संघात निवड झाली आहे.

आयसीसीने निवडलेला एकदिवसीय क्रिकेट संघ – डेव्हिड वॉर्नर, क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), ए बी डिव्हिसिअर्स, जे बटलर, मिशेल मार्श, रविंद्र जाडेजा, मिशेल स्टार्क, कगिसो रबाडा, सुनील नरेन, इमरान ताहीर.

पुरस्कार विजेते

विराट कोहली (हिंदुस्थान) – कॅप्टन ऑफ द इअर (एकदिवसीय क्रिकेट)

रविचंद्रन अश्विन (हिंदुस्थान) – क्रिकेटर ऑफ द इअर (सर्व प्रकारचे क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट)

क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) – क्रिकेटर ऑफ द इअर (एकदिवसीय क्रिकेट)

कार्लोज ब्रेथवेट (विंडिज) – आयसीसी टी-२० परफॉर्मर ऑफ द इअर

मुस्ताफिजुर रेहमान (बांगलादेश) – इमर्जिंग प्लेअर ऑफ द इअर