क्रिकेटच्या मैदानावरून विराट कोहली टेनिस कोर्टवर

2

सामना ऑनलाईन । सिडनी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक दिवसीय मालिका जिंकल्यानंतर निवांत वेळ मिळालेल्या विराट कोहलीने थेट टेनिस कोर्ट गाठले. विराट आणि त्याची बायको अनुष्का शर्मा हे आज ऑस्ट्रेलियन ओपनमधील सेरेना विलियम्स हिचा सामना बघायला आले होते. यावेळी त्यांनी पुरुष टेनिस स्टार रॉजर फेडररची देखील भेट घेतली. अनुष्का व विराट दोघांनीही या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


View this post on Instagram

What a day at the Australian open. ❤ An amazing way to finish the Australian summer. Forever grateful❤#ausopen

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on


View this post on Instagram

Beautiful sunny day at tennis with this beautiful sunny boy ❤️ #AustralianOpen #ausopen

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

शुक्रवारी हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियामध्ये झालेला रोमहर्षक सामना टीम इंडियाने सात गडी राखून जिंकला. या विजयासह हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याचा विक्रम केला. ऑस्ट्रेलियाच्या टूरनंतर आता लगेचच टीम इंडिया न्युझिलंड दौऱ्यावर जाणार आहे. येत्या 23 जानेवारीला हिंदुस्थान व न्युझिलंडमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.