कोहलीला अजून बरंच शिकायचंय, गावसकरांचा स्ट्रेट ड्राईव्ह

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका 4-1 अशी गमावल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्री यांना टिकाकारांनी लक्ष्य केलं आहे. याच संदर्भात बोलताना टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटला अजून बरंच काही शिकायचं आहे असं म्हटलं आहे.

Asia Cup : महामुकाबला! हिंदुस्थान पाकिस्तानशी भिडणार, वाचा खास बाबी…

गावसकर म्हणाले की, ‘विराटला अजून बरंच काही शिकायचं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आणि आता इंग्लंडच्या दौऱ्यावर देखील योग्य क्षेत्ररक्षण व गोलंदाजीत योग्य बदल केल्यास सामन्याचा निकाल वेगळा लागू शकतो. टीम इंडियाचा कमकुवतपणा या ठिकाणी प्रकार्शाने दिसून आला. त्याला (विराट) कर्णधारपदाची धुरा सांभाळून आता कुठे दोन वर्ष (विराट कसोटीमध्ये चार वर्षांपूर्वी कर्णधार झाला होता) झाली आहेत. त्यामुळे त्याच्यात अनुभवाचा अभाव स्पष्ट दिसून येतोय. ‘

पत्रकाराच्या ‘बेस्ट’ प्रश्नावर विराटचा रागाराग; म्हणाला, हे तुमच्या …

विराटला एका मुलाखतीमध्ये आताचा संघ 15 वर्षातील सर्वात सर्वोत्तम आहे का असा प्रश्न विचारला होता. परंतु कोहलीने रागाने तुम्हाला काय वाटतं? असा प्रतिप्रश्न केला होता. याबाबत बोलताना गावसकर म्हणाले की, ‘विराटला असा प्रश्न विचारण्याची ही योग्य वेळ नव्हती. पराभवानंतर स्वाभाविकपणे तो दु:खी असतो. पत्रकाराने विचारलेला हा प्रश्न योग्यही असू शकतो परंतु कोणताही कर्णधार अशावेळी हेच उत्तर देईल.’