विराट कोहलीचा तरुणांना मोलाचा सल्ला!

सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थान क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने देशातील युवकांना मोलाचा सल्ला दिला आहे. तरुणांची मैदानी खेळ खेळण्यावर भर द्यावा तसेच सोशल मीडियावर कमीत कमी वेळ घालवावा. कोहली एका ब्रँडच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी बोलत होता. विराट म्हणाला की, कोणत्याही सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नये. मी देखील सोशल मीडियावर अधिक घालवला आहे. मात्र आता मला कळून चुकलंय की सोशल मीडियावर गरजेपेक्षा जास्त वेळ घालवणे म्हणजे वेळेचा अपव्यव आहे.
तरुण मुलं मैदानी खेळ खेळण्याऐवजी व्हिडिओ गेम जास्त खेळतात. मात्र शरीराची हालचाल होणे गरजेचे आहे. त्यामुळे शारीरिक स्वास्थासाठी व्यायाम करणेही गरजेचं आहे. विराट आजच्या तरुणपिढीसाठी रोल मॉडेल आहे. विराटचे सर्वाधिक फॅन्सही तरूण आहेत. म्हणून विराट म्हणाला की, आजची मुलं जास्त वेळ व्हिडिओ गेम आणि आय- पॅड्सवर घालवतात. मात्र आम्ही जास्तीत जास्त वेळ मैदानात खेळत घातवत होतो.