दक्षिण आफ्रिकेतील रस्त्यावर दिसलं विराट-शिखरचं भांगडा प्रेम

सामना ऑनलाईन । केपटाऊन

साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेला हिंदुस्थानी संघ मालिका सुरू होण्याआधी मज्जा करण्याच्या मूडमध्ये आहे. कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये रस्त्यावरच भांगडा करताना दिसत आहेत. या दोघांना अनेकदा भांगडा करताना तुम्ही पाहिल असेल. मात्र रस्त्यावर भांगडा करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

येत्या ५ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. केपटाऊनमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यात शिखर धवन खेळणार नाही. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असल्याने शिखरला या सामन्याला मुकावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात हिंदुस्थानी संघ ३ कसोटी सामने, ६ वन डे आणि ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. हिंदुस्थानने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही मालिका जिंकलेली नसल्याने विराट सेनेसमोर हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे.