विराट कोहलीला आणखी एक जागतिक विक्रम मोडण्याची संधी


सामना ऑनलाईन।

लाईक करा, ट्विट करा

विराट कोहली ज्या ज्या वेळी खेळपट्टीवर पाय रोऊन उभा राहीला त्या प्रत्येक वेळेस जागतिक रेकॉर्ड तुटले आहेत. शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर इंग्लंडविरूद्धची चौथी आणि शेवटची कसोटी सुरू होणार आहे. या कसोटीमध्ये विराट कोहलीला एका जगप्रसिध्द विक्रमादित्याचा ४५ वर्षांचा अबाधित रेकॉर्ड मोडण्याची संधी चालून आली आहे. हा विक्रमादित्य दुसरा तिसरा कुणीही नसून हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावस्कर आहेत.

virat-for-new-site-1
१९७१ साली अगदी पदार्पणातच एका मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या सहाय्याने १५४.८० च्या सरासरीने गावस्कर यांनी एकूण ७७४ धावा फटकावल्या होत्या. त्यांचा हा जागतिक विक्रम कोणीही मोडू शकलेलं नाही. गावस्करांच्या या कामगिरीमुळे हिंदुस्थानने वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्याच मायभूमीतच लोळवलं होतं. हिंदुस्थानने हा सामना तर जिंकलाच होता शिवाय मालिकाही जिंकली होती.
इंग्ल्ंडविरूद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहलीने सात डावांमध्ये ६४० धावा केल्या आहेत. त्यात एका द्विशतकाचा समावेश आहे. विराटला सुनील गावस्करांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी १३५ धावांची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात सुनील गावस्करांच्या विक्रमाजवळ पोहोचला होता. तेव्हा त्याला केवळ ८ धावा कमी पडल्या होत्या.
इंग्ल्ंडविरूद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने ६० धावा केल्यास एका मालिकेत ७०० धावा पूर्ण करणारा तो दुसरा हिंदुस्थानी फलंदाज ठरणार आहे. आणि १३५ धावा केल्यास एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवला जाईल.