वर्ल्डकपमधील हिंदुस्थानच्या संघातील ‘या’ खेळाडूला पर्याय मिळणे कठीण!

15

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसी विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. हिंदुस्थानचा संघ या स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. हिंदुस्थानचा माजी सलामीवीर खेळाडू विरेंद्र सेहवाग याने संघातील एका खेळाडूवर स्तुतिसुमनं उधळली असून त्या खेळाडूला पर्याय मिळणे कठीण असल्याचे म्हटले आहे. हिंदुस्थानच्या संघामध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्यासारखा प्रतिभावान खेळाडू कोणीही नाही. पांड्याचा समावेश अशा खेळाडूंमध्ये होतो की ज्याला कोणताही पर्याय नाही, असेही विरू म्हणाला.

नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या 12 व्या मोसमात हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. पांड्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारात चांगली कामगिरी केली आणि मुंबईला चौथ्यांदा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. पांड्याने आयपीएलमध्ये 15 सामन्यात 402 धावा केल्या. पांड्याच्या या कामगिरीचे कौतुक करताना क्रिकेटनेक्स्टशी बोलताना विरू म्हणाला की, फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये पांड्याच्या कामगिरीशी मिळताजुळता एकही खेळाडू नाही.

hardik-pandya-ipl-mumbai

याआधी माजी कर्णधार सौरव गांगुलीने पांड्याचे कौतुक केले होते. विश्वचषकामध्ये पांड्या मुख्य भूमिका निभावताना दिसू शकतो. तो सध्या सर्वोत्तम फॉर्मात आहे. हिंदुस्थानसाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे, असे गांगुली म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या