वीरू भडकला, पाकिस्तानला आणखी एक ‘डोस’ देण्याची मागणी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानी सैनिकांनी हिंदुस्थानी जवानांच्या शरीराचे अवयव कापल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. पाकिस्तानच्या दुष्कृत्याविरोधात देशभर नागरिक निदर्शनं करत आहेत. त्याच वेळी हिंदुस्थानचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग चांगलाच भडकला आहे. सेहवागनं ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे. वीरूनं पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याची मागणी केली आहे.


‘दोन हिंदुस्थानी सैनिकांसोबत झालेल्या अमानवी कृत्यामुळे दु:खी आहे. जर त्यांना (पाकिस्तान) छोटा डोस (सर्जिकल स्ट्राईक) कमी पडला असेल; तर मोठा डोस देण्यात यावा’, असं ट्विट करत वीरूनं पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याची मागणी केली आहे.

हिंदुस्थानने बदला घेतला! सात पाकिस्तानी जवानांना कंठस्नान

दरम्यान, पाकिस्तानी सैन्यानं सीमेवर हिंदुस्थानी जवानांसोबत केलेल्या आगळीकेचा हिंदुस्थाननं बदला घेतला आहे. हिंदुस्थानी सैन्यानं पाकिस्तानच्या दोन पोस्ट उध्वस्त केल्या आहेत.