मीम प्रकरणी विवेक ऑबेरॉयचे लोटांगण, मागितली माफी

8

सामना ऑनलाईन । मुंबई

एक्झिट पोलची खिल्ली उडवताना अभिनेता विवेक ऑबेरॉय याने ऐश्वर्या रायवरील एक मीम शेअर केला होता. त्यावरून चांगलेच वादळ निर्माण झाले होते. आता जर कोणी दुखावले असेल तर आपण माफी मागतो असे सपशेल लोटांगण घातले आहे.

एक्झिट पोलची खिल्ली उडवताना एक मीम शेअर केला होता. त्यात ऐश्वर्या राय आधी सलमान, नंतर स्वतः विवेक ऑबेरॉय आणि अभिषेक बच्चन आणि आराध्या होती. आणि त्यात ओपिनियन पोल, एक्झिट पोल आणि निकाल अशी कॅप्शन दिली होती. त्यावरून नेटकर्‍यांनी त्याला चांगलेच सुनावले होते. तसेच महिला आयोगानेही त्याला नोटीस पाठवली होती. यावर आपण माफी मागणार नाही. तसेच महिला आयोगाला आपण स्पष्टीकरण देऊ असा पवित्रा विवेकने घेतला होता.

आता ट्विट करून विवेकने म्हटले आहे की, “त्या मीमवरून एक जरी महिलेचा अपमान झाला असेल तर मी माफी मागतो.” ट्विट डीलीट केल्याचे त्याने म्हटले आहे.

त्यानंतर केलेल्या एका ट्विटमध्ये विवेकने म्हटले आहे की, “एखादा गोष्ट काहींना विनोदी वाट असेल तर काहींना नाही. गेली 10 वर्षे मी महिला सक्षमीकरणाच्या कार्यात 2 हजार मुलींचे पुनर्वसन केले आहे.  कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा विचारही मी करू शकत नाही.”

आपली प्रतिक्रिया द्या