स्पष्टीकरण देईन, पण माफी मागणार नाही – विवेक ओबेरॉय

147

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर अभिनेता विवेक ऑबेरॉयने शेअर केलेल्या मीमवरून वाद सुरू झाला आहे. ओबेरॉयने सलमान खान, ऐश्वर्या रॉय, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्याचा फोटो मीममध्ये वापरला होता. याप्रकरणी महिला आयोगाने दखल घेत त्याला नोटिसही पाठवली आहे. सोशल मीडियावरही विवेक ओबेरॉय ट्रोल होत आहे, परंतु त्याने याप्रकरणी माफी मागण्यास नकार दिला आहे.

एएनआयशी बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाला की, लोकं बोलत आहेत की माफी माग. मला माफी मागण्यात कोणतीही अडचण नाही, परंतु मला सांगा की मी काय चूक केली आहे? जर मी काहीही चुकीचे केले नसेल तर माफी का मागू. मला माहिती नाही लोकं याचा एवढा मोठा मुद्दा का बनवत आहेत. एकाने मला हा मीम पाठवला, मी हसलो आणि त्यांच्या कलेची कौतुक केले. जर तुमच्यावर कोणी हसत असेल तर त्याला गंभीरतेने घेऊ नये, असेही तो म्हणाला. तसेच आपण याप्रकरणी माफी मागणार नाही, परंतु स्पष्टीकरण देऊ, असे विवेक ओबेरॉय म्हणाला.

नक्की काय आहे मीममध्ये?
विवेकने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या मीममध्ये ऐश्वर्याचा सलमानसोबत फोटो आहे त्याला ‘ओपिनीयन पोल’ अशी कॅप्शन दिली आहे. त्यानंतर विवेक ओबेरॉयचा आणि ऐश्वर्याचा फोटो आहे, त्याला ‘एक्झिट पोल’ अशी कॅप्शन दिली आहे. तर तिसरा फोटो अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याचा फोटो आहे. त्यात आराध्याला ‘अंतिम निकाल’ असे कॅप्शन दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या