कोपरगावमध्ये पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार, विविध संघटनांचा  निर्धार

2

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव शहराचा पाणीप्रश्‍न अत्यंत गंभिर बनला असून शहरावर आता पाणी-बाणीचे संकट मोठे उभे ठाकले आहे. आता कोपरगांवकरांना  मे महिन्याच्या दुसर्‍या आठवडयात आवर्तन सुटल्यावरच पाणी मिळणार असल्याने कोपरगांवकरांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

पाण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही पालिका व शासनाकडून  याची दखल घेतली जात नसल्यामुळे या  विविध संघटनांनी  मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

कोपरगाव शहराला  तेरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही नाराजी मतदानावर बहिष्कार टाकून व्यक्त करण्याचा निर्णय शहरातील संघटनांनी घेतला. या निर्णयाची माहिती मुख्य अधिकारी तहसीलदार  जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी या पत्राची गंभीर दखल घेत  पाण्याचा प्रश्न योग्य असून तो तातडीने सोडवावा आणि त्यांना मतदानावर बहिष्कार टाकण्यापासून परावृत्त करण्याचे वरिष्ठांना कळविले आहे.

कोपरगाव शहराच्या गंभीर व भीषण पाणी टंचाई बाबत  विविध संघटनांनी आज पर्यंत आपल्याकडे  पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा आम्ही  मतदानावर बहिष्कार टाकू  असा इशारा देणारे  निवेदन दिले आहेत.

यावर तहसीलदार म्हणाले की, “आमच्याकडे आलेल्या सर्व संघटना व  नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर विचार व निर्णय घेण्यासाठी  सर्वांचे म्हणणे वरिष्ठ पातळीवर पाठवून दिले आहेत. तशी  सर्व नागरिक व संघटना यांना कल्पना दिली  आहे.” त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकू नये असेही त्यांना सांगितले असल्याचे चंद्र म्हणाले.