तरूणाचा असाही दानधर्म, आधी मतदान मग रक्तदान

1

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मतदानाचा पवित्र हक्क बजावा, असे सांगताना मतदानानंतर रत्नागिरीतील एका तरूणाने रक्तदान करत आपला दानधर्म सर्वांपुढे आणला. तरूणवर्ग मतदानाकडे पाठ फिरवतात असं म्हटलं जातं मात्र काही तरूण मतदानाची जनजागृती व्हावी यासाठी पुढाकार घेत आहेत.

लोकशाहीच्या हितासाठी मतदान आणि लोकांच्या जीवनमानासाठी रक्तदान, अशी दोन्ही पवित्र दान रत्नागिरीतील तरूण वरूण लिमये यांनी आज केली आहेत. वरूण लिमये यांनी आज सकाळी कर्ला मराठी शाळा येथील मतदान केंद्रावर मतदान केले आणि त्यानंतर रेड क्रॉस येथे जाऊन वरूणने रक्तदान करत नवा दानधर्म सर्वांसमोर ठेवला.