हिमाचलमध्ये आज मतदान, काँग्रेस-भाजपमध्ये लढाई

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 68 जागांसाठी उद्या गुरुवारी मतदान होत आहे. येथील लढत मुख्यतः भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. या निवडणुकीत विद्यमान 62 आमदारांसह 337 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचे भवितव्य ठरणार आहे. येथून भाजप-काँग्रेस सर्व जागा लढवीत आहे. त्याखालोखाल बसपाने 42 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, ही निवडणूक झाल्यानंतर 9 व 14 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत विधानसभेची निवडणूक होईल.