गोव्यात मतदारांमध्ये उत्साह; दुपारी 1 पर्यंत 45.26 टक्के मतदान

सामना प्रतिनिधी, पणजी

गोव्यात आज लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे.आज सकाळ पासूनच मतदार घराबाहेर पडून मतदान करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.दुपारी 1 वाजे पर्यंत 45.11टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री प्रमोद सावंत,राज्यपाल मृदुला सिन्हा,भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक, नरेद्र सावईकर, काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर, फ्रान्सिस सार्दिन, आपचे उमेदवार एल्विस गोम्स, प्रदीप पाडगावकर, पोटनिवडणुकांसाठी जोशुआ डिसोझा, सुधीर कांदोळकर दयानंद सोपटे, जीत आरोलकर, बाबी बागकर, सुभाष शिरोडकर आदिंनी मतदान केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले.सकाळी 9 वाजे पर्यंत पहिल्या दोन तासात जवळपास 13 टक्के मतदान उत्तर आणि दक्षिण गोव्यात झाले होते. दुपारी 11 वाजे पर्यंत त्यात भरच पडत गेली.मतदानासाठी असलेली सुट्टी सार्थकी लावत मतदार मतदानासाठी मोठ्या संख्येने घरा बाहेर पडत आहेत.तापमान 34 ℃ असून देखील लोक मतदानासाठि घरा बाहेर पडत आहेत.

दुपारी 11 वाजेपर्यंत उत्तर गोव्यात 26.52 तर दक्षिण गोव्यात 26.58 % मतदान झाले होते.दोन्ही ठिकाणचे मिळून एकूण मतदान 26.55 टक्के होते.लोकसभे बरोबर विधानसभेच्या पोटनिवडणुकांसाठी देखील भरघोस मतदान झाल. शिरोडा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 29.16,म्हापशात 26.81तर मांद्रे मतदारसंघात 25.60 टक्के मतदान झाले होते. दुपारी 1 वाजता हाती आलेल्या माहिती नुसार उत्तर गोव्यात 46.26,दक्षिण गोव्यात 43.97 % मतदान झाले त्याची एकूण टक्केवारी 45.11 टक्के आहे. शिरोडा पोटनिवडणुकीसाठी 45.26,म्हापशात 47.19तर मांद्रे मतदारसंघात 45.95 टक्के मतदान झाले आहे.सायंकाळ पर्यंत ही टक्केवारी वाढत जाईल अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.ईव्हीएम मशीन्स बिघडल्याच्या अनेक तक्रारी आल्या असून त्यामुळे काही मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेत अडथळे आल्याची माहिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या