लातूरकरांना प्रतिक्षा मोठ्या पावसाची

32

सामना प्रतिनिधी । लातूर

सलग दुसऱ्या दिवशी लातूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. मंगळवारीही दुपारपर्यंत सूर्यदर्शनही झालेले नव्हते. मागील २४ तासात जिल्ह्यात २८.४५ मि.मी.सरासरी पाऊस झाला. लातूर जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची समस्या दुर होण्यासाठी लातूरकरांना मोठ्या पावसाची अजूनही प्रतिक्षा आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे हे आजपर्यंत झालेल्या पावसाचे आहेत. लातूर तालुका २४.३८ मि.मी.(३७२.९९), औसा तालुका २०.८६ मि.मी.(३६४.७०), रेणापूर तालुका ३१.२५ मि.मी.(४३३), अहमदपूर तालुका ४६.१७ मि.मी.(५७०.८०), चाकूर तालुका ३०.८० मि.मी.(४०९.०२), उदगीर तालुका २४.४३ मि.मी.(४६४.७८), जळकोट तालुका ३९.५० मि.मी.(४०८.५०), निलंगा तालुका २१.७५ मि.मी.(४६५.२२), देवणी तालुका १९.६७ मि.मी.(४७०.०१), शिरुर अनंतपाळ तालुका २५.६७ मि.मी.(५४८.३३), लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८०२.१३ मि.मी एवढी असून आजपर्यंत ४५०.७३ मि.मी. पाऊस झालेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या