लष्कराच्या ‘ट्रायडेंट’ मोहिमेवर चित्रपट

7

सामना ऑनलाईन, मुंबई

एकीकडे हिंदुस्थानी लष्कराचा पराक्रम दाखवणारे ‘बॉर्डर’, ‘एलओसी कारगिल’ आणि ‘उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’ हे युद्धपट गाजलेले असतानाच 1971 साली हिंदुस्थानी जवानांनी पाकिस्तानच्या कराची बंदरावर केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या ‘ट्रायडेंट’ या मोहिमेवर ‘नेव्ही डे’ नावाचा चित्रपट येणार आहे. निर्माते भूषणकुमार यांनी आपल्या या सिनेमाची घोषणा ट्विटरवर सोमवारी केली. यासोबत त्यांनी या चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमसोबत आपला फोटोही शेअर केला आहे. 1971च्या 4 आणि 5 डिसेंबरच्या मधल्या रात्री हिंदुस्थानी नौदलाने कराचीमध्ये ही ‘ट्रायडेंट’ मोहीम यशस्वी केली होती. या यशानंतरच 4 डिसेंबर हा दिवस दरवर्षी ‘नौदल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या युद्धात लष्कराने प्रथमच ऍण्टीशिप मिसाईलचा वापर करत पाकिस्तानची तीन जहाजे नष्ट केली होती. 2020मध्ये या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या