वैष्णवांची देहूत मांदीयाळी, आज पंढरपूरास प्रस्थान

सामना प्रतिनिधी । देहू

’संसार आलीया । एक सुख आहे । आठवावे रुप । विठ्ठलाचे…’ हीच ओढ मनी धरून श्रीविठ्ठल भेटीस आतूर झालेल्या वैष्णवांची मांदीयाळी देहूत जमून आली आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा विठूरायांच्या भेटीसाठी उद्या (दि. १६) दुपारी अडीच वाजता श्री क्षेत्र देहूतून प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी श्रीसंत तुकाराम महाराज संस्थान, देहूगाव ग्रामपंचायत, पोलिस, आरोग्य विभाग सज्ज झाले आहे. संस्थानतर्पेâ मुख्य गाभारा, भजनी मंडप, महाद्वार, दर्शन मंडप, राममंदिर, चौघडाघर, दर्शनबारी आदी ठिकाणी लावलेल्या बत्तीस वॅâमेNयांद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. संस्थानचे तीस सेवेकरी वारीकरी भाविकांच्या सेवेसाठी आहेत. प्रस्थानादिवशी महाद्वारातून भाविकांना मुख्य मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे, असे संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ तथा बाळासाहेब मोरे यांनी सांगितले.

अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, पोलिस उपअधिक्षक गणपत माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ९ पोलिस निरीक्षक, ३३ सहायक पोलिस निरीक्षक व फौजदार, ३६९ पोलिस कर्मचारी, १६१ गृहरक्षक दलाचे जवान इतका मोठा फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे. पोलिसांतर्फे मंदिर परिसराबरोबरच पालखी मार्गावर विविध बारा ठिकाणी तात्पुरते सीसीटीव्ही वॅâमेरे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरूण मोरे यांनी दिली. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्पेâ देहूगावामध्ये ठिकठिकाणी तीन आरोग्य बुथ उभारण्यात आले आहेत. प्रत्येक बुथवर दोन वैद्यकीय अधिकारी आणि दोन परिचारीका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याद्वारे वारीकरी, दिंडीकरी, भाविकांना प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

देहूगाव ग्रामपंचायतीतर्फे सर्वत्र स्वच्छता करण्यात आली असून विविध ठिकाणी असणाNया पिण्याच्या पाण्याचे बोअरवेल, विहीरी आदी ठिकाणी आवश्यक क्लोरीन टाकण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे सत्तावीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. इंद्रायणी नदी काठावर पाच ठिकाणी हायमस्ट दिवे बसविण्यात आले आहेत. तीन प्राथमिक शाळा, तसेच संत तुकाराम महाविद्यालयामध्ये वारक-यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे, असे संरपचं सुनिता टिळेकर यांनी सांगितले.