जगभरात दरवर्षी 8 लाख नागरिक करतात आत्महत्या

80
murder

सामना ऑनलाईन। वॉश्गिंटन

जगभरात दरवर्षी 8 लाख नागरिक आत्महत्या करत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. दरम्यान, जगभरात 1990 पासून आत्महत्येच्या दरात घट झाल्याचेही आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

बीएमजे जर्नल मधील ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज यात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात आत्महत्या हा सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वाधिक महत्वाचा मुद्दा असल्याचे संघटनेने म्हटले आहे. तसेच 2016 साली 8 लाख 17 हजार लोकांनी आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. याच वर्षात आत्महत्येच्या दरात 6.7 टक्क्यांनी वाढ झाली होती. पण त्याचवेळी 1 लाखातील 16.6 व्यक्तींनी आत्महत्या केल्या होत्या. पण आता हा आकडा 11.2 वर आला आहे. यात 32.2 टक्कयांनी घट झाली आहे. त्यातही महिलांच्या तुलनेत आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. यातही 15 ते 19 वर्ष वयोगटातील तरुणांची संख्या यात अधिक आहे. एक लाख पुरुषांमधील 15.6 टक्के लोकांनी आत्महत्या केली आहे. तर दुसरीकडे महिलांमध्ये हा आकडा 7 एवढा आहे. हिंदुस्थान आणि चीनमध्ये 2016 साली 44.2 टक्के नागरिकांनी आत्महत्या केल्या होत्या. पण चीनमध्ये 1990 नंतर आत्महत्येचा दर 64.1 टक्क्यांनी वाढला आहे. तर हिंदुस्थानमध्ये आत्महत्येचा दर 15.2 टक्क्यांनी कमी झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या