लिओनार्दोचे 3125 कोटींचे पेंटिंग सौदीमध्ये !

4

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

अखेर जगातील सर्वोत्कृष्ट कलाकृती समजल्या जाणाऱया लिओनार्दो द विंचीच्या ‘सल्वाटोर मुंडी’ या पेंटिंगचा ठावठिकाणा समजला आहे. सर्वात महागडे असे हे पेंटिंग सौदी अरेबियाचे राजकुमार सलमान अल सऊद यांच्या नौकेवर आहे. 2017 साली एका लिलावात या पेंटिंगची खरेदी 3 हजार 125 कोटींना झाली होती. त्यानंतर हे पेंटिंग कुठे गेले याबाबत कुणाला काहीच माहीत नव्हते. अखेर ‘सल्वाटोर मुंडी’चा पत्ता सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

आर्ट डिलर केनी शेक्टर यांनी आर्टन्यूज या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात ‘सल्वाटोर मुंडी’ पेंटिंग गरगुंतआन याटवर असल्याची माहिती दिली आहे. हे याट सौदीचा राजा सलमान बिन अब्दुल अझीझ अल सऊद यांचे पुत्र मोहमद बिन सलमान अल सऊद यांचे आहे. लवकरच ते अल उला शहरातील सरकारी कार्यालयात ठेवले जाणार आहे. हे ठिकाण सौदीचे सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या