400 विद्यार्थ्यांचे 70 कोटींचे ‘स्टुडंट लोन’ फेडणार

42

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अटलांटाच्या मोरहाऊस कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आजचा दिवस कधीच विसरू शकणार नाही. अब्जाधीश उद्योगपती रॉबर्ट स्मिथ यांनी कॉलेजात शिकणाऱया 400 विद्यार्थ्यांच्या डोक्यावर असलेले 70 कोटींचे ‘स्टुडंट लोन’ माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आणि विद्यार्थी- पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

मोरहाऊस कॉलेजच्या दीक्षांत समारंभात रॉबर्ट स्मिथ यांना गौरवण्यात आले. ते स्वत; या कॉलेजचे विद्यार्थी होते. गरिबीत कर्ज काढून शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांची जाण ठेवत त्यांनी विद्यार्थ्यांना कर्जमाफी दिली. स्मिथ यांच्या या घोषणेने विद्यार्थी -पालक उठून उभे राहिले. त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. मोरहाऊस कॉलेजचे अध्यक्ष डेव्हिड थॉमस यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजमध्ये सुमारे 396 पदवीधर विद्यार्थी आहेत. टय़ुशन, वर्ग आणि अन्य बाबींवर मिळून प्रतिवर्ष 48 हजार डॉलर खर्च होतो. त्यामुळे विद्याथी कर्ज काढून शिकतात. कर्जाचे हप्ते फेडू शकत नसल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढला आहे. त्यांच्या कर्जमाफीने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

कर्ज चुकवण्यासाठी 25 वर्षे

अमेरिकेत अनेक विद्यार्थी स्टुडंट लोन काढून शिकतात. त्यांना दीड कोटींचे कर्ज चुकवण्यासाठी 25 वर्षे लागतात. त्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्याला आपला निम्मा पगार द्यावा लागतो. अमेरिकेच्या विद्यार्थ्यांवर 105 लाख कोटींचे कर्ज असल्याचे समजते.

कोण आहेत स्मिथ
रॉबर्ट एफ स्मिथ हे अब्जावधी गुंतवणूकदार आहेत. परोपकारी व्यक्ती अशी त्यांची ख्याती आहे. ते विस्टा इक्विटी पार्टनर्सचे संस्थापक आणि सीईआहे आहेत. त्यांची कंपनी सॉफ्टवेअर, डेटा आणि टेलॉजी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. त्यांची एकूण संपत्ती 31 हजार 290 कोटी रुपये एवढी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या