धोनीचा पिपाणी डान्स पाहून साक्षीलाही हसू आवरले नाही

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. राजकुमारी झिवासोबतचे अनेक क्यूट व्हिडिओ तो नेहमीच शेअर करत असतो. कॅप्टन कूल बनून आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या धोनीचा हटके अंदाज त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे.

न्यूझीलंड विरूद्धची कसोटी आणि टी२० मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. धोनी देखील आपली राजकुमारी झिवा आणि पत्नी साक्षीसोबत मजा मस्ती करत आहे. एका कार्यक्रमामध्ये धोनीने केलेल्या डान्सचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

अवघ्या १२ तासात जवळपास ७ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून ८ हजाराहून अधिक लोकांनी तो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनीला डान्स करायला सांगितलं जातं. सुरुवातीला धोनी थोडा लाजताना दिसतो. मात्र नंतर ‘देसी बॉइज’चं ‘झक मारके’ गाण्याची ट्यून वाजल्यानंतर माही चांगलाच थिरकताना दिसत आहे. त्याची पिपाणी अॅक्शन पाहून तर साक्षीला ही हसू आवरता आलं नाही.