पाहा व्हिडीओ : सनी लिओनीचा निघाला घाम!

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री सनी लिओनी आपल्या सुबक शरिरासाठी ओळखले जाते. आपले शरीर हे कायम फिट आणि योग्य आकारात रहावे यासाठी सनी नेहमीच कठोर परिश्रम घेत असते. त्यासाठी सनी लिओनी रोज जिममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करत ‘वर्क आऊट’ करते.

सनी नुकतीच दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये गेली होती. त्यावेळी जिममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडीओ सनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत सनी एक जाडजूड पेटी ढकलतेय. ही पेटी भलतीच जाडजूड झाल्याने सनी चांगलीच दमलीय. त्यामुळे पुढच्या वेळी मला हलकी पेटी ढकलण्यास हवी अशी विनंती सनीने आपल्या जिम प्रशिक्षकाकडे केली आहे.

सनीने जिममध्ये पुशअप करतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. पुशअप करण्याचा मला नेहमीच तिटकारा वाटतो अशी लाडिक तक्रार सनीने या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये केली आहे.

The one thing I hate the most!! Push-ups!! @lian_wentzel

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on