ग्रा.पं.चा ‘वॉटर एटीएम’ बंद ; पाण्यासाठी नागरिकांचे हाल

1

सामना प्रतिनिधी । कौसडी

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामपंचायतच्या वतीने सुरू करण्यात आलेले थंड व शुध्द पाण्याचे ‘वॉटर एटीएम’ मागील दोन ते तिन दिवसापासून बंद पडल्याने नागरिकांना २० लिटर थंड व शुद्ध पाण्यासाठी १० ते १५ रूपये जास्त मोजावे लागत आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

आक्टोंबर २०१८ मध्ये १५ हजार जनतेच्या समस्याचा व आरोग्याचा विचार करत ग्रामपंचायतच्या पुढाकाराने शुद्ध व थंड पाण्याचे वॉटर एटीएम सुरू करण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायतचे व्यवस्थित नियोजन नसल्याने हे वॉटर एटीएम अनेकवेळा बंद पडले होते. यामुळे नागरिकांना खासगी जार प्लॅटवरून १५ ते २० रूपये प्रती २० लिटर पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत चालेला असून मनुष्याला थंड पाण्याची अत्यंत गरज असते. दिवस भरातून ५ ते ६ लिटर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर सुध्दा देत आहे. कौसडी येथील सर्वसामान्य नागरिकांना वॉटर एटीएमवरून थंड व शुद्ध पाण्यासाठी फक्त ५ रूपये मोजावे लागत होते. मात्र ग्रामपंचायतच्या हलगर्जीपनामुळे हे वॉटर एटीएम बंद पडल्याने २० लीटर थंड व शुद्ध पाणी खाजगी जार प्लॅनवरून १० ते १५ रूपये जास्त देऊन पाणी आणावे लागत आहे. स्थानिक ग्रामपंचायतने हे वॉटर एटीएम लवर दुरूस्त करून नागरिकांचे होणारे हाल थांबवावेत व थंड व शुद्ध पाणी वॉटर एटीएमवर उपलब्ध करावे, अशी नागरिकातून मागणी होत आहे.