आमदार वैभव नाईक यांनी शब्द पाळला; कुडाळ ग्रामीण रूग्णालयाला टॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

9

सामना प्रतिनिधी । कुडाळ

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने सोमवारपासून कुडाळ ग्रामीण रूग्णालयाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी स्वखर्चाने टँकर पाठवून रूग्णालयाला भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यात पुढाकार घेतल्याने रूग्ण व नातेवाईकांमधून आ. नाईक यांचे आभार मानले जात आहेत.

या ग्रामीण रूग्णालयाची बोअरवेल बंदावस्थेत असून विहीरीचेही पाणी आटले होते. त्यामुळे रूग्णालयाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. याची दखल आ. वैभव नाईक यांनी घेतली. पाण्याची टंचाई लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी स्वतः आ. नाईक यांनी घेत सोमवारी कणवकली येथून पहिला पाण्याचा टँकर रूग्णालयात पाठविला. दर चार दिवसांनी रूग्णालयाला टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जाणार आहे. तालुक्यात नेरूर येथेही आ. नाईक यांच्या सहकार्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या