रत्नागिरी शहरात 298 फुकटे नळधारक, कारवाईवरच फिरलं पाणी

53

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

रत्नागिरी शहरातील नागरिकांना पुरेस पाणी मिळत नसताना शहरात तब्बल 298 नळजोडण्या अनधिकृत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या पाहणीत 298 अनधिकृत नळजोडण्या सापडल्या होत्या मात्र त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने नगरसेवकांनी आज रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नाराजी व्यक्त केली.

शहरात पाणीपट्टी भरणाऱ्यांना पाणी मिळत नसताना 298 नळजोडणीतून फुकट पाणी वापरले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.त्याच बरोबर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेबाबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करताना कुत्रे पकडताना आम्ही कुणालाही पाहिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. सन्मित्रनगर येथील उद्यानात शुल्क आकारण्याच्या मागणीलाही विरोध करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या