मध्य रेल्वेच्या २० स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन कार्यरत

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेच्या २० रेल्वे स्थानकांवर ३७ वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात येणार आहेत. एकूण ७६ वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात येणार असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३७ वॉटर वेंडिंग मशीन कार्यरत झाल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि कल्याण येथे प्रत्येकी चार, पनवेल येथे तीन आणि इगतपुरीत दोन वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. तर भायखळा, परळ, कुर्ला, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी, मुलुंड, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, मानखुर्द, किंग्जसर्कल आणि रे रोड येथे प्रत्येकी एक वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात आली आहेत. या वॉटर वेंडिंग मशीनमध्ये पाणी शुध्दीकरणासाठी आरओ मशीन बसविण्यात आली असून बॅक्टेरियामुक्त शुद्ध पाणी प्रवाशांना स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.

पाण्याचे दर खालील प्रमाणे –

पाण्याचे प्रमाण          कंटेनरशिवाय         कंटेनरसह
३०० मिली               १ रूपये                 २ रूपये
५०० मिली               ३ रूपये                ५ रूपये
१ लिटर                  ५ रूपये                ८ रूपये
२ लिटर                  ८ रूपये                १२ रूपये
५ लिटर                  २०रूपये                २५ रूपये