गणेश विसर्जनसाठी समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षकांचा वॉच

सामना प्रतिनिधी । पणजी

गणेशोत्सव सण अवघ्या 2 दिवसांवर आला आहे. अशावेळी राज्य सरकारद्वारे नियुक्त केलेली ‘दृष्टी’ ही जीवरक्षक एजन्सी विसर्जन करायला येणाऱ्या लोकांना मदत करणार आहे. याशिवाय त्यांची सुरक्षा बाळगण्यासाठी विविध सूचनादेखील त्या ‘दृष्टी’ने दिल्या आहेत. 13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2018 दरम्यान भक्तांना विसर्जनावेळी पूर्ण रात्र मदतीचा हात तसेच त्यांच्या सुरक्षतेचा विचार करत 42 समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांना नियुक्त करण्यात येईल.

गणेश चतुर्थी उत्सवावेळी लोकांना विसर्जनावेळी पूर्ण रात्र ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांना 42 समुद्रकिनाऱ्यांवर नियुक्त करण्यात येईल. 13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2018 या कालावधीत जीवरक्षकांना 28 जाग्यांवर त्यांच्या नियमित निर्धारित तासांपेक्षा अधिक वेळ काम करावे लागणार आहे.

नियुक्त केलेल्या समुद्रांवर जीवरक्षक लोकांना गणपती विसर्जित करून त्यांना व्यवस्थित किनाऱ्याजवळ यायला मदत करणार आहेत. काही वेळा जर समुद्र जर खवळलेला असेल तर पूजा करून जीवरक्षक स्वत: पाण्यात उतरून गणपतीची मूर्ती विसर्जित करणार आहेत.

‘दृष्टी’ने लोकांना विसर्जन दरम्यान मुख्य प्रवेशाकडून जाण्यास सांगितले आहे. इथे जीवरक्षक असणार आहे किंवा तुम्ही मदतीसाठी जीवरक्षक टॉवरशी संपर्क साधू शकतात.

‘दृष्टी’ने मोठ्यांना लहान मुलांवर खास नजर ठेवण्यास सांगितली आहे. जरी पाण्याला ओहोटी असली तरीदेखील त्यांना रात्रीच्यावेळी पाण्याजवळ जाऊ न देण्याचा संदेश दृष्टीने दिला आहे. याशिवाय सणासुधींच्यावेळी स्थानिकांव्यतिरिक्त पर्यटकदेखील आनंद लुटण्यासाठी येतात अशावेळी काही लोक मद्य पिऊन आलेले असतात त्यामुळे त्यांचा स्वत:वर ताबा राहत नसल्याने दृष्टीने त्यांना पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय आपातकालिनवेळेसाठी ‘दृष्टी’ने अतिरिक्त बॅक अप जीवरक्षक व गाड्या स्टॅन्डबायवर ठेवल्या आहेत.

13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान खालील समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक नियुक्त केले जाणार आहे.
1. बायणा, 2. बोगमाळो, 3. वेळसाव, 4. आरोशी, 5. होळंत, 6. माजोर्डा, 7. उतोर्डा, 8. बेताळभाटी,
9.कोलवा, 10.सेरनाभाटी, 11.दुधसागर, 12.बाणावली (मुख्य समुद्र), 13.बाणावली (ताज एक्सोटिका हॉटेलजवळ), 14.वार्का, 15.झालोर, 16.कासावली, 17.मोबोर, 18.बेतुल व चिंचणी, 19.आंगोद, 20.काबदे राम, 21.कोला, 22.पाळोळे, 23.पाटणे, 24.राजबाग, 25.कोलंब, 26.गालजिबाग, 27.ताळपण, 28.पोळे, 29.केरी, 30.हरमल, 31.मोरजी, 32.आश्वे, 33.वागातोर, 34.हणजूण, 35.बागा,
36.कळंगुट, 37.कांदोळी, 38.शिकेरी, 39.कोको बीच, 40.मिरामार, 41.दोनापावल, 42.शिरदोण.