मदाम तुसाद बनवणार मेणाची सनी लिओनी

68

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीच्या प्रसिद्ध मदाम तुसाद संग्रहालयात अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी लंडनहून एक खास टीम सनीच्या भेटीला आली होती. या टीमने तब्बल २०० वेळा सनीच्या शरीराची मापं घेतली, जेणेकरून अचूक मापाचा पुतळा बनवता येईल.

सनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून ही माहिती तिच्या चाहत्यांशी शेअर केली आहे. मी मदाम तुसाद संग्रहालयाची आभारी आहे. त्यांनी माझा पुतळा बनवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी खूपच आनंदित आहे. त्यांच्या टीमला भेटून मला एक नवीन आणि अविस्मरणीय अनुभव मिळाला आहे. आता मी स्वतःला पुतळ्याच्या रुपात पाहायला प्रचंड उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया सनीने दिली आहे.

सनीचा पुतळा या वर्षाच्या अखेरीस तयार होईल, असा अंदाज आहे. यापूर्वी येथील संग्रहालयात सचिन तेंडुलकर, सलमान खान, माधुरी दीक्षित, कतरिना कैफ, करिना कपूर खान अशा निरनिराळ्या सेलिब्रिटींचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या