कर्नाटक सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न नाही, येडियुरप्पांचा शब्द

1

सामना ऑनलाईन । बेंगरुळू

कर्नाटकमधील सत्तारूढ गठबंधन भाजप अस्थिर करणार नाही असा शब्द कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांनी दिला आहे. आदल्या दिवशी भाजपने आपले सर्व आमदार एका रिसॉर्टवर पाठवले होते, त्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांनी हे वक्त्यव्य केले आहे.

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की गुरुग्राममधून भाजपचे सर्व आमदार परतले असून त्यांना राज्यातील दुष्काळ दौर्‍याचे आदेश दिले आहे. येडियुरप्पा म्हणाले की, “रिसॉर्टमध्ये थांबलेल्या सर्व आमदारांना परत येण्याचे आदेश दिले होते. तिथून ते निघालेही आहेत. आता आम्हाला राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करावयाचा असून लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत.’’

आम्ही सरकार अस्थिर करण्यासाठी कुठलेच प्रयत्न करत नसल्याचे येडियुरप्पांनी म्हटले. तसेच आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी चांगली पार पाडू असेही ते यावेळी म्हणाले.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामैय्या म्हणाले की, “आमदारांना परत बोलवणे हा चांगला निर्णय आहे. फक्त येडियुरप्पा यांनी आपला शब्द पाळावा हीच आमची अपेक्षा आहे.”