हार्दिकच्या ऑफ कटर्सवर विश्वास – कोहली

सामना ऑनलाईन । थिरुवनंतपुरम

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडय़ाने अखेरच्या षटकांत प्रभावी गोलंदाजी करीत न्यूझीलंडला विजयापासून दूर नेले. त्यामुळे टीम इंडियाला ट्वेण्टी-२० मालिका जिंकता आली. यावर कर्णधार विराट कोहली म्हणाला, हार्दिक पांडय़ाच्या ऑफ कटर्सवर कमालीचा विश्वास होता. त्याने त्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. शिवाय महेंद्रसिंह धोनी चांगली कामगिरी करतोय असे स्पष्ट करीत विराट कोहलीने त्याची पाठराखणही केली.