‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती पाकिस्तानला आधी दिली!

सामना ऑनलाईन । लंडन

‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती आम्ही पाकिस्तानला आधी दिली. मीडियाला कळण्याआधी पाकिस्तानला माहिती द्या असे अधिकाऱ्यांना निक्षून सांगितले होते. ही आमची इमानदारी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे सांगितले. ते ऐतिहासिक वेस्टमिंस्टर सेंट्रल हॉलमधील ‘भारत की बात, सब के साथ’ या कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रामचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी केले. त्यानी मोदींना प्रश्न विचारले. हिंदुस्थानकडे सर्जिकल स्ट्राईकचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. हिंदुस्थानने कधीही इतरांच्या भूभागावर डोळा ठेवला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आमचा काहीही फायदा नसताना हिंदुस्थानी सैनिकांनी त्या युद्धात भाग घेतला याची आठवण त्यांनी करून दिली.

अल्पवयीन बलात्कार हा चिंतेचा विषय आहे. कोणत्या सरकारच्या काळात बलात्कार झाला हे महत्त्वाचे नाही. बलात्कार हा बलात्कार असतो. मुलींना प्रश्न विचारण्याऐवजी समाजाने मुलांना प्रश्न विचारावेत.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान