मुंबईवर मुसळधार पावसाचे ढग घोंगावताहेत

फाईल फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईमध्ये येत्या २४ तासांत पावसाच्या अधून-मधून जोरदार सरी कोसळतील असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर १७ आणि १८ सप्टेंबर रोजी मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

गुरुवारी रात्रीपासून मुंबई-ठाण्यासह राज्यात पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ-बदलापूर भागात मुसळधार पाऊस कोसळला. मुंबईतही बऱ्याच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागात वीजा देखील चमकत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र दुपारी पाऊस थांबला आणि साऱ्यांना हायसं वाटलं. मात्र असं असलं तरी २४ ते ४८ तासांत पाऊस अधून-मधून पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे.

उद्या कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.