ऑनलाइन लिखाण

वेब रायटिंग म्हणजे ऑनलाइन मीडिया किंवा वेबसाईट्ससाठी लेखन करणं… आकर्षक, अर्थपूर्ण आणि अनोखे लेख लिहिण्यासाठी कंपन्यांना वेब रायटर्सची गरज असते.

लेखनाची आवड असेल आणि चांगले लिहितही असाल तर वेब रायटिंग हे तुमच्यासाठी एक खूपच योग्य करीयर ठरू शकेल. आजचा काळच असा आहे ज्यात अनेक कंपन्यांच्या आपापल्या वेबसाईट्स असतात. पण त्यांच्याकडे त्या वेबसाईट्सवर लेखन करायला माणसं नसतात. कारण सर्वांकडेच लेखन कौशल्य नसते. त्यामुळे अलिकडच्या काळात तरी वेब रायटिंग हे एक चांगले करीयर होऊ शकते.

वेब रायटिंग म्हणजे ऑनलाइन मीडिया किंवा वेबसाईट्ससाठी लेखन करणं… आकर्षक, अर्थपूर्ण आणि अनोखे लेख लिहिण्यासाठी कंपन्यांना वेब रायटर्सची गरज असते. चांगले लेख ही आज प्रत्येक वेबसाईटची गरज बनली आहे. त्यासाठी ते वाटेल तेवढे मानधन द्यायलाही तयार असतात. वेबसाईटवर कंटेंट चांगलं असेल तर बिंग, याहू, गुगल वगैरे सर्च इंजीन्सवर त्या वेबसाईटला टॉप रँकिंग मिळू शकते. वेब रायटरला कंटेंट लिहिताना काही खास नियमांचे पालन करणं आवश्यक ठरतं. सर्च इंजीनच्या प्रतिमेनुसार लेख देऊ शकला नाहीत तर लोक ती वेबसाईट पाहणं बंद करतात.

असेही मानधन
वेब रायटिंग आज एक लोकप्रिय व्यवसाय आहे. त्यामुळे यात मानधन चांगलं मिळतं. असंच म्हणावं लागेल. सुरुवातीला कंपनीला तुमची योग्यता ठाऊक नसते त्यामुळे १५ ते २० हजार रुपये महिना मानधन दिले जाऊ शकते, पण अनुभवी वेब रायटर महिन्याला २५ ते ३५ हजार आरामात कमावू शकतो. फ्रिलान्सरही मुबलक कमावतो.

उज्ज्वल भवितव्य
वेब रायटिंगमध्ये तुम्ही फुल टाइम किंवा पार्ट टाइम यापैकी कोणताही पर्याय निवडू शकाल. फ्रिलान्सिंग वेब रायटिंगही करू शकता. एकदा अनुभव मिळाला की वेब रायटर, कंटेंट रायटर यांना कंटेंट एडिटरच्या पदापर्यंत पदोन्नती मिळू शकते. त्यामुळे अलिकडच्या काळात या व्यवसायाला उज्ज्वल भवितव्य आहे.

पात्रता
वेब रायटर बनण्यासाठी विशेष कोर्स नाही. पण लेखन कौशल्याचे महत्त्व पाहता अलिकडे काही संस्थांनी शॉर्ट टर्म ऑनलाइन कोर्सही सुरू केले आहेत. त्यात रायटिंग स्कील्स, शब्दसंग्रह आणि व्याकरण वगैरे शिकवलं जातं. हे प्रशिक्षण घेऊन कुणीही पदवीधर वेब रायटिंग क्षेत्रात करीयर करू शकतो. या कामासाठी संगणकाची चांगली माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याबरोबरच ऑनलाइन मार्केटिंगचे ज्ञान असले पाहिजे.