एका लग्नाची अशीही एक गोष्ट; मृत्यू अटळ असताना केलं लग्न!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लग्न म्हणजे आयुष्यातील आनंदाच आणि अविस्मरणीय क्षण असतो. लग्नात नवरा-नवरी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची शपथ घेतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करतात. मात्र अमेरिकेतल्या न्यू जर्सीमध्ये अनोखं आणि दु:खद लग्न पार पडलं. लग्न दु:खद या अर्थाने होतं कारण या लग्नातील नवरी मुलगी तिच्या आयुष्याच्या अंतिम घटका मोजत होती आणि हे लग्न लागलं त्यावेळी ती ऑक्सिजन मास्कसह अंथरुणावर होती.

अमेरिकेतील डेविड मोशर(३५) या युवकाने हेदर लिन्डसे(३१) या तरुणीशी हास्पिटलमध्ये लग्न केलं. हेदर हिला ब्रेस्ट कॅन्सर या आजारानं ग्रासलं होतं. या आजारामुळे तिचा मृत्यू होणार आहे हे ती जाणून होती. त्यामुळे तिने मृत्यूपूर्वी लग्न करण्याच निर्णय घेतला. हेदर आणि डेविड २०१५मध्ये भेटले होते, त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

हेदरच्या मैत्रिणीने त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोंमध्ये हेदर हॉस्पिटमध्ये बेडवर झोपलेली दिसत आहे. या लग्नात काही निवडक लोक उपस्थित होते. मात्र हेदरची प्रकृती अत्यंत खालावलेली असल्याने ती लग्नाची शपथ देखील बोलू शकत नव्हती. प्रसारमाध्यामांनी नवऱ्या मुलीच्या हिमतीला सलाम केला. मात्र हे लग्न फार काळ टीकू शकलं नाही आणि अवघ्या १८ तासांनंतर हेदरच्या मृत्यू झाला. मात्र मृत्यूला समोर पाहूनही न डगमगता हेदरने तिच्या आयुष्यातील मोठ निर्णय घेतला.