फुलोरा; आठवड्याचे भविष्य (१ जुलै ते ७ जुलै)

मानसी इनामदार,(ज्योतिषतज्ञ), <<[email protected]>>

मेष – कामे सुरळीत

दुसऱयांचे मन दुखवू नका. शब्द जपून वापरा. वरिष्ठांची मर्जी लाभेल. त्यामुळे कामे सुरळीत पार पडतील. छोटासा प्रवास घडेल. सोनेरी रंग जवळ बाळगा. ज्या कामासाठी जाल त्यात यश मिळेल. साहित्यिकांसाठी मस्त आठवडा. गृहिणींवर घरात कामाचा ताण पडेल. पण गोष्टी मनाप्रमाणे घडतील.

शुभ आहार – तुरीच्या डाळीचे वरण, बेसन, प्रथिने

वृषभ – जपून व्यवहार करा

रखडलेली कामे या आठवड्यात उरकून घ्या. कुटुंबीयांना दुखवू नका. त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतील. घरातील पाठिंब्यावरच त्यात यशस्वी व्हाल. निळा रंग जवळ बाळगा. व्यवसायात जपून व्यवहार करा.

शुभ आहार – हळीव, गूळ, गरम पदार्थ

मिथुन – आत्मविश्वास महत्त्वाचा

प्रिय व्यक्तीला गृहीत धरू नका. सामोपचाराचे धोरण ठेवा. अनपेक्षित आर्थिक लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास कमी येईल. परक्या व्यक्तीचा तुमच्या व्यक्तिगत बाबीतील हस्तक्षेप टाळा. हिरवा रंग जवळ बाळगा.

शुभ आहार – घावन, तांदळाचे पदार्थ, भात

कर्क – सकारात्मक ऊर्जा

आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम आठवडा. पावसात भिजणे टाळा. तुमची मुले तुम्हाला महत्त्वाच्या कामात मदत करतील. ती मदत खूप महत्त्वाची ठरेल. गुलाबाची ताजी फुले घरात ठेवा. सकारात्मक ऊर्जा खेळेल. लाल रंग महत्त्वाचा ठरेल. मनात चांगले विचार आणा.

शुभ आहार – गवती चहा, आले, तुळशीची पाने

सिंह – महत्त्वाचे निर्णय

या आठवडय़ातील संध्याकाळ खूप प्रसन्न असेल. प्रिय व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. त्याच्या सहवासात वेळ मजेत जाईल. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घ्याल. विनाकारण कामाच्या बाबत उदार धोरण स्वीकारू नका. जे ठरवले आहे त्यावर ठाम राहा.

शुभ आहार – गव्हाचे पदार्थ, भाकरी, पोळी

कन्या – आठवणींना उजाळा

जुने मित्रमैत्रिणी भेटतील. गोड आठवणींना उजाळा मिळेल. या भेटीतून काही भविष्यकालीन योजना ठरतील. त्या खूप फायद्याच्या ठरतील. घरात थोडे बदल होतील. त्याचा मानसिक ताण जाणवेल. पण काळजी नको. सगळे स्थिरस्थावर होईल. चमकदार रंग जवळ बाळगा.

शुभ आहार – थंड पेये, गुलाबाचे सरबत, सब्जा

तूळ – फायदेशीर प्रवास

घराची कर्तव्ये यथायोग्य पार पाडाल. पण स्वतःकडे दुर्लक्ष नको. संतुलित आहार वेळेवर घेण्याची सवय लाका. प्रवास फायदेशीर ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा. घरातील लहान मुलांबाबत सुवार्ता कानी येईल. त्यामुळे मनास उभारी मिळेल. चंदेरी रंग महत्त्वाचा.

शुभ आहार – संतुलित, पौष्टिक आहार

वृश्चिक – गुंतवणुकीत लाभ

जुनी येणी वसूल होतील. त्यामुळे गुंतवणुकीत लाभ होईल. त्यातून भरगच्च आर्थिक लाभ होईल. शारीरिक श्रमाची कामे टाळा. सहाय्यकांचे सुख लाभेल. तब्येतीस जपा. गरम पदार्थांचे सेवन करा. घरात गुलछडीची फुले ठेवा. पांढरा रंग महत्त्वाचा.

शुभ आहार – गवती चहा, भाज्यांचे सूप, कुळीथ पिठले

धनु – परिपूर्ण आठवडा

आनंदाने परिपूर्ण आठवडा. घरातील लहान गोष्टीत आनंद शोधाल. जोडीदाराची साथ खूप मोलाची. पण लहानसहान कारणाकरून होणारे वाद टाळा. मनातील योजना साकारतील. गणेशाचे पूजन करा. मनोकामना पूर्ण होतील. पिवळा रंग तुमच्या राशीसाठी नेहमीच फलदायी.

शुभ आहार – चिकन, अंडी, शक्तिवर्धक पदार्थ

मकर – मानसिक समाधान

खासगी आणि गोपनीय माहिती परक्या व्यक्तीसमोर कधी उघड होऊ देऊ नका. भावनिक व्हाल. पण काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतील. घरातील व्यक्तींना तुमच्या मदतीची गरज भासेल. तुम्ही ती कराल. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. राखाडी रंग महत्त्वाचा.

शुभ आहार – मिसळ, चटकमटक

कुंभ – आर्थिक लाभ

शेअर बाजारातील गुंतवणूक फायद्याची ठरेल. त्यातून अनपेक्षित आर्थिक लाभ संभवतो. त्यामुळे मन प्रसन्न राहील. कामाचा ताण असेल. पण तो जाणवणार नाही. कामाच्या ठिकाणी तुमची बाजू वरचढ ठरेल. सांभाळून बोला. अबोली रंग परिधान करा.

शुभ आहार – नैसर्गिक फळे, भाज्या

मीन – मन स्थिर ठेवा

संतुलित आहार आणि व्यायाम ही तुमची बलस्थाने आहेत. त्यात कमी पडू नका. व्यायामाचा खूपच फायदा होतो. ताणतणाव जाणवतील. पण खंबीरपणे तोंड द्या. त्यात यशस्वी व्हाल. मन सकारात्मक आणि स्थिर ठेवा. त्यातून योग्य निर्णय घ्याल. हिरवा रंग जवळ ठेवा.

शुभ आहार – नारळाचे पदार्थ, प्रथिने

समस्या-

न्यायालयीन खटले खूप रखडले असतील, त्यावर वेळ, पैसा दोन्ही वाया जात असेल तर…

तोडगा

रोज संध्याकाळी प्रवेशद्वाराजवळ तेलाचा दिवा लावावा व त्यात दोन काळीमिरी घाला. निकाल लवकर लागेल.