साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 13 ते शनिवार 19 मार्च 2022

>> नीलिमा प्रधान

मेष – निर्णयाची घाई नको

मेषेच्या व्ययेशात सूर्य राश्यांतर, स्वराशीत राहू वक्री, तुळेत केतू वक्री होत आहे. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. नोकरीत व्याप वाढेल. व्यवसायात नियम डावलू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गंभीर आरोप होतील. महत्त्वाची कामे करण्याची जिद्द बाळगा.
शुभ दिनांक – 16, 17

वृषभ – प्रगतीकारक वातावरण राहील

वृषभेच्या एकादशात सूर्य राश्यांतर, व्ययेशात राहू व सप्तमेशात केतू वक्री आहे. व्यवसाय, नोकरीत प्रगतीकारक वातावरण राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व सिद्ध करता येईल. सहकारी, नेते यांच्या सहकार्याने योजनांना गती मिळेल. घर, जमिनीसंबंधी कामे मार्गी लावा.
शुभ दिनांक – 13, 14

मिथुन – नव्या विचारांच्या दिशेने

मिथुनेच्या दशमेशात सूर्य राश्यांतर, मेषेत राहू वक्री, तुळेत केतू वक्री होत आहे. प्रत्येक दिवस नव्या विचारांकडे नेणारा ठरेल. नोकरीत किचकट काम करून दाखवाल. व्यवसायात संधी मिळाली तरी दडपण राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांची मर्जी राहील. कुटुंबात खर्च वाढेल. शुभ दिनांक – 14, 15

कर्क – अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या

कर्केच्या भाग्येशात सूर्य राश्यांतर, मेषेत राहू, तुळेत केतू. सोमवारपासून तुमच्या समस्या कमी करता येतील. मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव वाढू देऊ नका. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. तुमच्या हिताचा विचार करणारी व्यक्ती ओळखा.
शुभ दिनांक – 15, 16

सिंह – नवीन परिचय धोकादायक

सिंहेच्या अष्टमेशात सूर्य राश्यांतर, मेषेत राहू, तुळेत केतू. रविवारी महत्त्वाची कामे करून घ्या. व्यवसायात करार करण्याची घाई नको. गुंतवणूक करताना चूक नको. नोकरीत अडचणी येतील. नवीन परिचयात धोकादायक. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना चूक दाखवण्याची संधी. शुभ दिनांक – 16, 19

कन्या – प्रकृतीकडे दुर्लक्ष नको

कन्येच्या सप्तमेशात सूर्य राश्यांतर, मेषेत राहू, तुळेत केतू वक्री होत आहे. आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिशाभूल होईल. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न निर्माण होईल. शुभ दिनांक – 14, 15

तूळ -व्यवसायातील अंदाज चुकेल

तुळेच्या षष्ठेशात सूर्य राश्यांतर, मेषेत राहू, तुळेत केतू. आठवड्याच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. होळीच्या सणाला कोणताही अतिरेक करू नका. व्यवसायातील अंदाज चुकेल. नोकरीत वैर करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाबद्दल संशय घेतला जाईल. घरात नमते धोरण ठेवा.
शुभ दिनांक – 13, 14

वृश्चिक – क्षुल्लक वादाचे प्रसंग होतील

वृश्चिकेच्या पंचमेशात सूर्य राश्यांतर, मेषेत राहू, तुळेत केतू. रेंगाळलेल्या कामांना गती देता येईल. जवळच्या माणसांमध्ये क्षुल्लक वादाचे प्रसंग होतील. व्यवसायात जिद्दीने काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात यश खेचून आणता येईल. कटू अनुभव दूर करून नव्या दिशेने वाटचाल कराल.
शुभ दिनांक – 14, 15

धनु – दगदग होईल

धनुच्या सुखस्थानात सूर्य राश्यांतर, मेषेत राहू, तुळेत केतू. सप्ताहाच्या सुरुवातीला गैरसमज, दगदग होईल. व्यवसायात सुधारणा करता येईल. वरिष्ठांची मर्जी राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक तणाव होईल. तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळेल.
शुभ दिनांक – 13, 16

मकर – नव्या उमेदीने काम करा

मकरेच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर, मेषेत राहू, तुळेत केतू वक्री होत आहे. आत्मविश्वास वाढवणाऱया घटना घडतील. तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. बुधवार, गुरुवार संयम ठेवा. नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना गतिमान कराल. नव्या उमेदीने काम करा.
शुभ दिनांक – 14, 15

कुंभ – मनस्ताप सहन करावा लागेल

कुंभेच्या धनेशात सूर्य राश्यांतर, मेषेत राहू, तुळेत केतू येत आहे. तुमच्या कार्यात बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. उत्साहाच्या भरात कोणतेही विधान करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कारवायांचा सामना करावा लागेल. मनस्ताप सहन करावा लागेल. धूलिवंदनाच्या दिवशी तारतम्य सोडू नका.
शुभ दिनांक – 16, 17

मीन – प्रगतीची संधी मिळेल

स्वराशीत सूर्य राश्यांतर, मेषेत राहू, तुळेत केतू. उत्साह वाढेल. होळीच्या दिवशी कोणतेही गैर काम करू नका. व्यवसायात सुधारणा होईल. कर्जाच्या कामात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नवी दिशा मिळेल. प्रगतीची संधी मिळेल.
शुभ दिनांक – 15, 19