साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 17 डिसेंबर ते शनिवार 23 डिसेंबर 2023

>> नीलिमा प्रधान

मेष – ताणतणाव जाणवेल

शुक्र, हर्षल प्रतियुती, सूर्य, बुध युती. सप्ताहाच्या मध्यावर भावनिक ताणतणाव होईल. मनावर दडपण येईल. उत्साहाच्या भरात एखादा निर्णय घ्याल. नोकरीत हुशारी दिसेल. धंद्यात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनस्ताप होईल. अनाठायी खर्च होईल. मान, प्रतिष्ठा वाढवणारी चर्चा कराल. चिंता जाणवेल. शुभ दिनांक : 17, 18

वृषभ – सौम्य धोरण ठेवा

मंगळ, हर्षल षडाष्टक योग, चंद्र, शनि, युती. दगदग, धावपळ वाढेल. जवळच्या व्यक्तीची चिंता वाटेल. तणाव व वाद होईल. सौम्य धोरण सर्वत्र ठेवा. नोकरीच्या कामात चूक होईल. धंद्यात हिशोब नीट करा. मौल्यवान वस्तू, कागदपत्रे जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होईल. वक्तव्य करताना कायदा पाळा. शुभ दिनांक : 17, 19

मिथुन – कामाची प्रशंसा होईल

सूर्य, चंद्र लाभयोग, सूर्य, बुध युती. प्रत्येक दिवस सत्कारणी लावा. महत्त्वाची कामे करा. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. नवी संधी मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. नवीन परिचय प्रेरणादायक ठरतील. पद, अधिकार मिळेल. कुणाला कमी लेखू नका. घरातील व्यवहार पूर्ण करा. शुभ दिनांक : 18, 19

कर्क – कायदा पाळा

चंद्र, शनि युती, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. व्यावहारिक दृष्टिकोन योग्य असला तरी त्यामुळे त्रास होईल. अहंकारयुक्त भाषा समस्या निर्माण करेल. नोकरी टिकवा. वाहन जपून चालवा. धंद्यात कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात कारस्थान होईल. नाराजी जाणवेल. सावध रहा. शुभ दिनांक : 20, 21

सिंह – महत्त्वाचा निर्णय घ्याल

बुध, गुरू त्रिकोणयोग. रवि, बुध युती. महत्त्वाचे निर्णय घेता येईल. कठीण कामे मार्गी लावाल. सप्ताहाच्या मध्यावर तणाव जाणवेल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात लाभ होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आत्मविश्वास वाढवणारे प्रसंग येतील. मान, प्रतिष्ठा वाढेल. शुभ दिनांक : 19, 22

कन्या – आत्मविश्वास वाढेल 

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, सूर्य, बुध युती. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. कोणतेही वक्तव्य करताना अतिशयोक्ती नको. नोकरीत गैरसमज होतील. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग होईल. प्रकृतीची काळजी घ्या. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. कायदा पाळून काम करा. शुभ दिनांक : 20, 21

तूळ – चर्चेत यश मिळेल 

सूर्य, चंद्र लाभयोग, रवि, बुध युती. कठीण कामे करून घ्या. खर्च वाढेल. नवीन परिचय होतील. कार्याच्या विस्तारावर लक्ष द्या. नोकरीत प्रभाव पडेल. धंद्यात वसुली करा. नवे काम मिळवा. चर्चेत यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे अनुभव येतील. वरिष्ठ मान देतील. योजना वेळेत पूर्ण करा. शुभ दिनांक : 18, 22

वृश्चिक – स्पर्धा वाढेल

रवि, बुध युती, मंगळ, हर्षल षडाष्टक योग. क्षुल्लक वाद वाढवू नका. मैत्रीत गैरसमज होतील. नोकरीत कर्तृत्व दिसेल. जवळच्या वाटणाऱ्या व्यक्ती काडय़ा घालतील. धंद्यात मोहाला बळी पडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा गवगवा होईल. मानसन्मान वाढेल. स्वतचे प्रश्न सोडवा. शुभ दिनांक : 20, 21

धनु – क्षुल्लक गैरसमज होतील 

बुध, गुरू त्रिकोणयोग, सूर्य, बुध युती. महत्त्वाची कामे करताना रागावर, भावनेवर ताबा ठेवा. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यात क्षुल्लक गैरसमज होतील. भावनेच्या आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना मदत करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ दिनांक : 17, 18

मकर – अहंकार दूर ठेवा 

चंद्र, शनि युती, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. नोकरीत नाराजी राहील. उतावळेपणा, अहंकार ठेवल्यास कामात अडचणी येतील. मैत्रीच्या नात्याने कठीण कामे करून घ्यावी लागतील. धंद्यात, खरेदी-विक्रीत सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवीन परिचय उत्साहवर्धक. मान, प्रतिष्ठा सांभाळा. शुभ दिनांक : 19, 20

कुंभ – कामे मार्गी लावा  

सूर्य, चंद्र लाभयोग, सूर्य, बुध युती. प्रत्येक दिवस उत्साहाचा व प्रेरणादायी. कठीण कामे रेंगाळत ठेऊ नका. नोकरी, धंद्यात प्रगती होईल. खरेदी-विक्रीत लाभ. चांगला बदल शक्य. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे अंदाज अचूक ठरतील. नवे डावपेच ठरवता येतील. ओळख, प्रतिष्ठा वाढेल. साहित्याला विषय मिळेल. शुभ दिनांक : 20, 21

मीन – प्रसंगानुरूप निर्णय घ्या

बुध, गुरू त्रिकोणयोग, शुक्र, हर्षल प्रतियुती. साडेसाती सुरू आहे. प्रसंगानुरूप निर्णय घ्या. माणसे ओळखणे तुम्हाला चांगले जमते. नोकरी, धंद्यात अधिक उत्तम संधी लाभेल. वसुली करा. जीवनाला प्रोत्साहित करणारा प्रसंग घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद, सन्मान मिळेल. डावपेचात गुप्तता बाळगा. शुभ दिनांक: 17, 22