आठवड्याचे भविष्य- 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2018

112

मानसी इनामदार

समस्या • धूम्रपान, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून मुक्ती हवी असेल तर…

तोडगा – रोज सकाळी अनुशापोटी घरी केलेले गायीचे 25 ग्रॅम तूप भक्षण करावे. व्यसनांची तीव्रता कमी होऊ लागते.

मेष – अपेक्षित लाभ

गरजूंना मदत जरूर करा. पण विनाकारण इतरांच्या कामात लुडबुड करू नका. उगाच अडचणीत याल. नवे करार फायदेशीर ठरतील. अपेक्षेप्रमाणे लाभ होतील. पण आर्थिक गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. भगवा रंग जवळ ठेवा. हनुमानाची उपासना करा.
शुभ आहार…ताजी फळे, सीताफळ

वृषभ – प्रतिष्ठा लाभेल
आपली बलस्थाने ओळखून भविष्यातील योजना आखा. यशस्वी व्हाल. कोणत्याही गोष्टीतील चांगल्या वाईट बाबी पडताळून पहा. चांगल्या व्यक्तींच्या सहवासात याल. त्यामुळे समाजात प्रतिष्ठा लाभेल. जोडीदाराशी पुन्हा एकदा भावपूर्ण संबंध निर्माण होतील. पांढरा रंग महत्त्वाचा.
शुभ आहार …तांदळाची खीर, दही

मिथुन – मनोबल वाढेल
प्रसन्नदायी आठवडा. विनाकारण कोणाशी भांडण काढू नका. अलिप्त राहणे चांगले. कामाच्या ठिकाणी नव्या कल्पना सुचतील. घरातील व्यक्तींना वेळ द्या. त्यामुळे मनोबल वाढेल. कौटुंबिक पाठिंबा नेहमीच महत्त्वाचा ठरतो. त्यातून महत्त्वाचे निर्णय घ्याल. अबोली रंग जवळ ठेवा.
शुभ आहार…टुटीप्रुटी आईस्क्रीम, संत्रे

कर्क– दागिन्यांत गुंतवणूक
महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. त्याचा आर्थिक लाभ होईल. खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेत जरूर भाग घ्यावा. यशस्वी व्हाल. महिला वर्गाने दागदागिन्यांमध्ये गुंतवणूक जरूर करावी. दूरगामी फायदा होईल. भावंडांचा पाठिंबा मिळेल. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार…रंगीबिरंगी भाज्या, कोशिंबिरी

सिंह – प्रियजनांची साथ
लहान मुलांबरोबर खेळण्यात वेळ मजेत जाईल. मनास उभारी मिळेल. मनोरंजनावर पैसे खर्च होतील. त्यावर नियंत्रण ठेवा. नवे मित्र भेटतील. उतावीळपणाने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रियजनांचे मन जपा. ते तुमची साथ देतील. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ आहार …बटाटा, सुरण

कन्या – आनंदाचे क्षण
तुमच्या दयाळू स्वभावामुळे या आठवडय़ात अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल, पण इतरांवर अतिखर्च करू नका. पैसे जपून ठेवा. एखाद्या स्पर्धेत यश मिळेल. आवडीच्या गोष्टी आवर्जून करा. संगीतात रमाल. उत्तम आठवडा. आवडते संगीत ऐकाल. चॉकलेटी रंग जवळ बाळगा.
शुभ आहार...चॉकलेट मिल्कशेक, कोको

तूळ – सुखकारक व प्रसन्न
पुरातन वस्तू आणि दागिन्यांमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवाल. त्यामुळे आठवडा सुखकारक आणि प्रसन्न असेल. तब्येतीस जपा. विश्रांती महत्त्वाची. घरात वेळ चांगला जाईल. रिकाम्या वेळात भविष्यकालीन योजनांची आखणी कराल. तांबडा रंग महत्त्वाचा.
शुभ आहार…उसळी, डाळी

वृश्चिक – आर्थिक फायदा
अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला चांगल्या दिवसांकडे घेऊन जाणार आहे. आठवडय़ाच्या उत्तरार्धात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगा. त्यातूनच त्यांची प्रगती होईल. कायमचा वैरभाव कोणाशीही ठेवू नका. जांभळा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार... तांदळाची पानगी, धिरडे

धनु – उत्साहाचे वातावरण
तुमची ऊर्जा पातळी अतिशय उच्च असेल. नवीन उत्साहपूर्ण परिस्थितीचा अनुभव घ्याल. पण जोडीदाराशी वादविवाद संभवतात. त्याकडे दुर्लक्ष करा. या आठवडय़ात तुमचा आर्थिक फायदा संभवतो. जोडीदारासमवेत विचारपूर्वक विधान करा. शब्दात सापडू नका. पिस्ता रंग जवळ बाळगा.
शुभ आहार …वडापाव, भजी

मकर – असामान्य काम
ग्रहमान अत्यंत अनुकूल आहे. एखादे असामान्य काम करून दाखवाल. काही अटकळी आणि अनपेक्षित गोष्टींमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू लागेल. घरात उगाच तणावाचे वातावरण निर्माण होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. अपत्यप्राप्तीचा योग आहे. चंदेरी रंग जवळ बाळगा.
शुभ आहार... नाचणीची भाकरी, पुळीथ पिठले

कुंभ – पत्नीचा प्रेमवर्षाव
मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. प्रिय व्यक्तीची उणीव जाणवेल. पत्नीच्या प्रेमाला उधाण येईल. प्रेम वर्षावात नाहून निघाल. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. सावध राहा. पिवळा रंग जवळ बाळगा. शुभ आहार… श्रीखंड, पियुष

मीन – धीर धरी
आता ध्येयावरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ हे लक्षात असू द्या. देवावर विश्वास ठेवा. सब्र का फल हमेशा मिठा होता है. आपल्या जगात आनंदी असाल. तुमची मुले आणि तुम्ही आनंदोत्सव साजरा कराल. केशरी रंग महत्त्वाचा.
शुभ आहार…दूध, दही

आपली प्रतिक्रिया द्या