आठवड्याचे भविष्य

228

>> नीलिमा प्रधान

मेष
व्यवसायात जम बसेल
तुमच्या मार्गातील अडचणी कमी झाल्या आहेत. राजकीय- सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व सिद्ध होईल. लोकप्रवाह तुमच्या दिशेने कसा वळवायचा हे तुम्ही जाणता. त्याप्रमाणे प्रयत्न करा. व्यवसायात जम बसेल. नवीन कंत्राट मिळेल. योग्य सल्ल्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करा. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

शुभ दिन – ३, ४

वृषभ
नवीन काम मिळवता येईल
कोणतेही क्षेत्र असो, चौफेर सावध रहा. धोका निर्माण होऊ शकतो. व्यवसायात तडजोड करून नवीन काम मिळवता येईल. आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांची, लोकांची नाराजी होईल. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक होण्याची शक्यता आहे.
शुभ दिन – ३०, ३१

मिथुन
परदेशी जाण्याची संधी
या आठवड्यात तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. उभारी वाटेल. नोकरीसाठी, शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. कुटुंबात मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल. जीवनसाथीला अधिकार मिळेल. सर्वांना खूष ठेवता येईल. राजकीय- सामाजिक क्षेत्रांत वर्चस्व वाढेल. वरिष्ठ तुमच्यावर खूष होतील.
शुभ दिन – ३०, ३१

कर्क
मोठे कंत्राट मिळेल
कौटुंबिक सुखात भर पडेल. व्यवसायाला चांगली कलाटणी मिळेल. प्रयत्न करा. मोठे कंत्राट मिळेल. कला-क्षेत्रात विशेष कामगिरी होईल. कल्पना कृती यांच्या समन्वय साधता येईल. राजकीय- सामाजिक क्षेत्रांत तुमच्याशी मैत्री करणारे लोक समोरून येतील. विरोधकसुद्धा तहाची भाषा करतील.
शुभ दिन – १, २

सिंह
पुरस्कार व लाभ मिळेल
या आठवडय़ात धावपळ, दगदग होईल. परंतु दौऱयातून तुमचे मन व प्रेम लोकांना समजू शकेल. राजकीय- सामाजिक क्षेत्रांत तुमचे डावपेच समोरच्या व्यक्तीला गोंधळात टाकणारे असतील. बुधवार, गुरुवार डोळय़ांची काळजी घ्या. गुप्त कारवायांना कमी समजू नका. पुरस्कार व लाभ मिळेल.
शुभ दिन- ३०, ३१

कन्या
प्रगतीचा मार्ग खुला
या आठवडय़ात तुमचे मन अस्थिर होईल. राजकीय- सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा राहील. मनाप्रमाणे निर्णय होण्याची आशा वाढेल. मुलांच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल. व्यवसायात जम बसेल. मोठे स्वरूप देता येईल. तुमच्या बुद्धिचातुर्याला इतरांनी केलेला ढिलेपणा सहन होत नाही.
शुभ दिन – ३१, १

तूळ
प्रयत्न यशस्वी होईल
जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कुटुंबातील व्यक्तींची चिंता कमी होईल. शुभकार्याचे ठरेल. व्यवसायातील मंदी कमी होईल. नव्या प्रेरणेने कार्य करू शकाल. राजकीय- सामाजिक क्षेत्रांत मागे राहू नका. वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करण्यास यश मिळेल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील.
शुभ दिन – ३, ४

वृश्चिक
कार्यतत्परता ठेवा
क्षेत्र कोणतेही असो, तुम्हाला तुमच्या क्षेत्रात कार्यतत्परता ठेवावी लागेल. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक वाढतील. गोड बोलून तुमच्या कामातील मुद्दे जाणून घेणारे लोक सहवासात येतील. राजकीय- सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा जोरदार प्रयत्न केला जाईल.
शुभ दिन – २९, १

धनु
घर, जमीन, वाहन खरेदी कराल
तुमच्यासाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रेंगाळत पडलेले काम करून घ्या. राजकीय- सामाजिक क्षेत्रांत योजना मार्गी लावा. वरिष्ठांच्या भेटीतून प्रेरणादायी विचार मिळतील. नेते, सहकारी यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. तुमच्या हिताचे काम करून घ्या. घर, वाहन, जमीन इत्यादी खरेदी होईल.
शुभ दिन – ३१, २

मकर
वाटाघाटीत यश मिळेल
मनावरील ताण हलका करता येईल. दौऱयात यश मिळेल. लोकांचे प्रेम मिळवता येईल. त्यांच्या गरजा समजून घ्या व कार्य करा. मागे वळून पाहण्यापेक्षा पुढचा रस्ता धरा. बोलण्यापेक्षा ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हे तत्त्व पहा. कुटुंबात तुमच्या बाजूने सर्व राहतील. वाटाघाटीत यश मिळेल. व्यवसायाला चांगले भागीदार मिळतील.
शुभ दिन – ३०, ३१

कुंभ
नोकरीत चांगला बदल
तुम्ही ठरविलेले कार्य वेळेत पूर्ण करण्यास मिळेल. तुमचे वर्चस्व सर्वत्र वाढेल. तुमची लोकप्रियता व निष्ठा यांचे कौतुक होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे मुद्दे हाती घ्या. चर्चा करा. प्रश्न सोडवा. नोकरीत चांगला बदल होईल. अधिकार मिळेल. कठीण वाटणारे कोणतेही काम याच सप्ताहात पूर्ण होऊ शकेल.

शुभ दिन – १, २

मीन
संयम बाळगा
आठवडय़ाच्या सुरुवातीला कुटुंबात, प्रेमात, धंद्यात अडचणी येतील. संयमाने प्रश्न सोडवा. विचारपूर्वक शब्द वापरा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर संशय घेतला जाईल. आरोप येईल. टीकात्मक चर्चा होईल. संतापजनक कृत्य करण्याचा प्रयत्न होईल. धंद्यात नवीन संधी मिळेल. घाईत निर्णय घेऊ नका.

शुभ दिन – ३, ४

आपली प्रतिक्रिया द्या