आठवड्याचे भविष्य

113

>> नीलिमा प्रधान

मेष – अडचणींवर मात कराल
मेषेच्या भाग्येषात सूर्यप्रवेश, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. योजनांना गती देता येईल. व्यवसायात अडचणींवर मात करू शकाल. कुटुंबातील प्रश्नांवर मार्ग मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांतील तणाव निवळेल. दिग्गज लोकांच्या विचारसरणी तुम्हाला प्रेरणादायी वाटेल. शुभ दि. 18, 19.

वृषभ – संयम बाळगा
सूर्य वृषभेच्या अष्टमेषात प्रवेश करीत आहे. बुध-गुरू युती होत आहे. व्यवसायात आठवड्याच्या सुरुवातीला निर्णय चुकण्याची शक्यता आहे. बेसावधपणे कृती करू नका. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. अडचणी तात्पुरत्या असल्या तरी मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. संयम व जिद्द महत्त्वाची ठरेल. शुभ दि. 21, 22.

मिथुन – गैरसमज दूर करा
मिथुनेच्या सप्तमेषात सूर्याचे राश्यांतर, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. कठीण प्रसंगावर मात करण्याची जिद्द येईल. व्यवसायातील अडचणी वाढू शकतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील गैरसमज दूर करण्याची एकही संधी सोडू नका. योजनांच्या पूर्ततेचा प्रयत्न करा. अनुभवी लोकांचा सहवास मिळेल. शुभ दि. 17, 18.

कर्क – व्यवसायात बदल होईल
कर्केच्या षष्ठेशात सूर्याचे राश्यांतर, बुध-गुरू युती होत आहे. कोणत्याही कठीण प्रसंगावर चतुराईने मात करू शकाल. अति आक्रमकता त्रासदायक ठरेल. तुमच्या प्रतिष्ठेवर त्याचा परिणाम होईल. एखाद्या प्रकरणात माघार घेण्याची वेळ येऊ शकते. व्यवसायात मोठा चांगला बदल होईल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा.  शुभ दि. 16, 17.

सिंह – प्रयत्नांचे फळ मिळेल
आठवडय़ाची सुरुवात दगदगीची, कटकटीची वाटू शकते. त्यानंतर मात्र तुमचे अंदाज, प्रयत्न व जिद्द याचे कौतुक राजकीय-सामाजिक क्षेत्रांत होईल. सिंहेच्या पंचमेषात सूर्याचे राश्यांतर, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. व्यवसायातील समस्या सोडवण्याचे सूत्र हाती लागेल. क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. शुभ दि. 21, 22.

कन्या – वर्चस्व वाढेल
सूर्याचे राश्यांतर कन्येच्या सुखस्थानात होत आहे. बुध-गुरू युती राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे वर्चस्व वाढवणार आहे. जाणकार लोकांच्या सहाय्याने तुम्ही प्रगतीचा वेग वाढवा. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत नव्या विचाराने प्रेरित व्हाल. कोर्ट केसमध्ये संमिश्र स्वरूपाची घटना घडेल. कोणताही निर्णय सर्वानुमते घ्यावा. शुभ दि. 16, 17.

तूळ – प्रगतीची संधी लाभेल
तुळेच्या पराक्रमात सूर्याचे राश्यांतर, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, चौफेर प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायात चांगला जम बसेल. थोरा-मोठय़ांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. वेळ कमी पडेल इतकी कामे समोरून येतील. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत विशेष संधी मिळेल. शुभ दि. 18, 19

वृश्चिक – तुमचे मत प्रभावी ठरेल
वृश्चिकेच्या धनेषात सूर्याचे राश्यांतर, बुध-गुरू युती. तुम्ही जे ठरवाल ते करण्याचा जोरदार प्रयत्न व्यवसायात करा. अडचणींवर मात करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत चमकाल. धाडसीपणा दिसेल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. प्रयत्न करा. शुभ दि. 17, 22

धनु – व्यवहारात दक्षता बाळगा
स्वराशीत सूर्याचे राश्यांतर, शुक्र-नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायातील, घरातील व्यवहारात दक्षता ठेवा. हिशेबात शुक्रवार, शनिवार गोंधळ होऊ शकतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत मागे राहण्याची गरज नाही. सातत्याने योजनांच्या पूर्ततेकडे लक्ष द्या. नोकरीत कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्या. शुभ दि. 18, 19

मकर – आव्हानात्मक काम कराल
मकरेच्या व्ययेषात सूर्य राश्यांतर, बुध-गुरू युती होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कठीण काम तुम्हाला करावे लागेल. आव्हानात्मक कार्य करण्याची तुमची वृत्ती आहे. वरिष्ठांचे सहाय्य थोडे कमी मिळेल. तुमच्या हिमतीने व बुद्धिचातुर्यानेच वागा. व्यवसायात मोठी उलाढाल करण्याची संधी मिळेल. खरेदी-विक्री करताना घाई करू नका.
शुभ दि. 17, 21

कुंभ – यशदायी काळ
कुंभेच्या एकादशात सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध प्रतियुती. तुमच्या कार्याचा डंका सर्वत्र पसरेल. कौतुकाची स्तुतिसुमने तुमच्यावर उधळली जातील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विस्ताराने कार्य कराल. लोकसंग्रह, लोकप्रियता वाढेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत पुरस्कार व लाभ मिळेल. नोकरीत चांगला बदल होईल. शुभ दि. 17, 18

मीन – योजना मार्गी लागतील
मीनेच्या दशमेषात सूर्य, बुध-गुरू युती. तुम्ही ठरविलेली प्रत्येक योजना मार्गी लावता येईल. अडचणींवर मात करून प्रगतीचा झेंडा सर्वत्र रोवता येईल. व्यवसायात पुढे जाल. मोठे काम मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वरिष्ठ तुमच्या पाठीशी खंबीरपणे असतील. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. शुभ दि. 18, 19.

आपली प्रतिक्रिया द्या