आठवड्याचे भविष्य

5

मानसी इनामदार, (ज्योतिषतज्ञ) [email protected]

हसा… आनंदी समस्या
घरात सासू-सुनांचे सतत वाद होत असतील, अजिबात पटत नसेल तर…

तोडगा
रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला घरात तीन वेळेला शंखनाद करावा… आणि दोघींनीही तिन्ही सांजेला देवाला केशरी दुधाचा नैवेद्य दाखवून तो भक्षण करावा.

मेष
भरपूर हसा
या आठवडय़ात घरात जास्तीतजास्त वेळ घालवा. कुटुंबीयांना जेवढा वेळ द्याल तेवढी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळेल. त्याचा फार चांगला परिणाम तुमच्या कामावर होईल. भरपूर हसा. हसण्याचे निमित्त शोधा. प्रकृतीच्या बारीकसारीक तक्रारी दूर होतील. निळा रंग फलदायी.
शुभ आहार…भोपळ्याची भाजी, फळवर्गातील भाज्या

वृषभ
बढतीचे योग
मित्र मैत्रिणींसमवेत वेळ मजेत जाईल. पैशाचे व्यवहार डोळ्यात तेल घालून करा. अनाठायी खर्च होण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी बदली आणि बढतीचे योग. भगवा रंग जवळ बाळगा. रखडलेली कामे होतील. मारुतीची उपासना करा.
शुभ आहार …गाजर, काकडी, सॅलेडची पाने

मिथुन
सरकारी नोकरी
तुमच्यातील कामाची क्षमता या आठवडय़ात प्रभावी ठरेल. त्यामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. हातातील काम तडीस न्याल. मेहनतीत कसूर करू नका. सरकारी नोकरी मिळेल. प्रयत्नशील राहा. विद्यार्थ्यांना आकस्मिक लाभ होईल. आवडीचा अभ्यास करायला मिळेल. हिरवा रंग फलदायी.
शुभ आहार…गरम पदार्थ, मिरी, मध

कर्क
व्यायाम महत्त्वाचा
नावीन्यपूर्ण कल्पना अमलात आणाल. प्रकृतीसाठी व्यायाम खूप महत्त्वाचा ठरेल. त्यात सातत्य ठेवा. निसर्गाच्या सान्निध्यात जा. गवतावर अनवाणी पायाने चाला. या आठवडय़ात तुमच्या घरात आनंदी वातावरण असेल. त्याच्या केंद्रस्थानी तुम्ही असाल. पांढरा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार… दूध, दुधाचे पदार्थ, पनीर

सिंह

आनंदी वातावरण
वास्तुविषयक इच्छा पूर्ण होतील. नव्या वास्तुखरेदीचे योग आहेत. जांभळा रंग जवळ बाळगा. कोणत्याही कामात अडथळा येणार नाही. थोडी विश्रांती आवश्यक आहे. आवडत्या गोष्टीत मन रमवा. त्यातून नवी ऊर्जा मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील.
शुभ आहार …गोड पदार्थ, शिरा, खीर

कन्या

आवडती व्यक्ती भेटेल

अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. घरातील देवांची पूजा मनःपूर्वक करा. भक्ती करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. यातून मानसिक शांतता लाभेल. या आठवडय़ात आवडत्या व्यक्तीशी तुमच्या भेटीगाठी होतील आणि त्या सुखावणाऱया ठरतील. विवाहयोग्य काळ. गुलाबी रंग जवळ ठेवा.
शुभ आहार…चेरी, मोसमी आंबा

तूळ

मित्राची मदत

शेअर बाजारातील गुंतवणूक फायद्याची ठरेल. यामध्ये मित्राची मदत होईल. ती अवश्य घ्या. घरात थोडय़ा कुरबुरी होतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. खूप पूर्वी केलेली गुंतवणूक आता कामी येईल. चंदनासव घ्या. चित्तवृत्ती शांत होतील. देवपुजेसाठी चंदनाचा वापर आवर्जून करा. चंदनाचा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार …थंड पदार्थ, ताक, अमृत कोकम

वृश्चिक

आर्थिक लाभ
तुमच्या कलात्मक बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर होईल. त्यामुळे नवीन ऊर्जेचा संचार होईल. घरात उत्साहाचे वातावरण असेल. स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. उत्तम आर्थिक लाभ होईल. पण मन उगाच अशांत राहील. घरातील लहानांचे लाड करा. मन रमेल. लाल रंग जवळ ठेवा.
शुभ आहार …डाळीचे पदार्थ, प्रथिने

धनू
निर्धार आणि मेहनत
तुमच्या भोवतीच्या लोकांच्या विचित्र वागणुकीमुळे तुम्ही चक्रावून जाल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. निर्धार आणि मेहनत या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कामावर होईल. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करा. कोनफळी रंग महत्त्वाचा.
शुभ आहार …चांगल्या प्रतीचे तेल, शेंगदाणे

मकर
लिखाण घडेल
अचानक हाती भरपूर पैसे येतील. पण त्याचा विनियोग जपून करा. त्यामुळे भविष्य सुरक्षित राहील. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. वाचन, लिखाण घडेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. धार्मिक विषयाकडे ओढले जाल. लोकरीचे वस्त्र जवळ बाळगा. चमकदार रंग लाभदायक.
शुभ आहार…. झणझणीत पदार्थ

कुंभ
ध्येय गाठाल
कामाच्या ठिकाणी तुम्ही दीपस्तंभाप्रमाणे उभे राहाल. त्यामुळे वरिष्ठ अतिशय खुश होतील. चुकीच्या माणसांवर जास्त विसंबून राहू नका. क्रीडापटूंसाठी यशदायी आठवडा. आपल्या ध्येयावर मन एकाग्र करा. प्रलोभनांना बळी पडू नका. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ आहार… नैसर्गिक पदार्थ

मीन
योग्य वाटचाल
विश्रांती आणि झोप ही जगण्यातील फार महत्त्वाची गोष्ट आहे. ही योग्य वेळ सांभाळल्यास बऱयाच गोष्टी साध्य होतील. कोणत्याही गोष्टीत सातत्य ठेवा. वरिष्ठ कामावर खुश होतील. योग्य मार्गाने जात आहात. तब्येतीची हेळसांड नको. पांढरा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार …. पथ्यकारक आहार