आठवड्याचे भविष्य- आनंद! आनंद!!

26

मानसी इनामदार

मेष – मनःसामर्थ्य वाढेल

परिस्थितीनुरूप स्वभावात लहरीपणा येईल. त्यावर नियंत्रण ठेवा. विनाकारण जवळची माणसे दुखावली जातील. या आठवडय़ात जोडीदाराला वेळ द्या. नात्याचे भावबंध दृढ होतील. पिवळा रंग जवळ बाळगा. झेंडूची फुले देवीला अर्पण करा. मनःसामर्थ्य वाढेल.शुभ परिधान-पित वस्त्र, सोन्याचे आभूषण

वृषभ – विचारपूर्वक गुंतवणूक
जवळच्या मित्रमंडळींसोबत कार्यक्रम आखाल. पण तेथे पैसे तुम्ही खर्च करणे टाळा. वाटल्यास नंतर पैसे द्या. विचारपूर्वक गुंतवणूक करा. घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. खूप दिवस रखडलेली कामे पूर्ण होतील. हिरवा रंग जवळ बाळगा. शुभ परिधान-हिरवा चुडा, पाचूचा खडा

मिथुन – आठवणींमध्ये रमाल
घराची स्वच्छता करण्यात वेळ जाईल. त्यात अनेक जुन्या वस्तू सापडतील. त्या जुन्या आठवणींमध्ये रमाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. पायदुखीचा त्रास संभवतो. गरम पाण्यात पाय शेकवा. मौल्यवान गोष्ट गवसेल. चमकदार रंग जवळ ठेवा. शुभ परिधान-चांदीचे आभूषण, प्रसन्न सुगंध

कर्क – प्रसन्न राहाल

कामाच्या ठिकाणी कामाचा ताण आणि वरिष्ठांचे दडपण जाणवेल. त्यांच्या मर्जीनुसार काम करा. कामाचा आनंद घ्या. तुलसीपत्राचे सेवन करा. भविष्यकालीन तरतूद कराल. त्यामुळे ताण असूनही चित्तवृत्ती प्रसन्न राहतील. सोनेरी रंग जवळ बाळगा. शुभ परिधान-सोन्याची कर्णभूषणे, पिवळे वस्त्र

सिंह – प्रयत्न महत्त्वाचे
जुन्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. पण भविष्यासाठी नशिबावर हवाला ठेवून बसू नका. प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचे. योग्य दिशेने प्रयत्न सुरू ठेवा. यश तुमचेच आहे. जोडीदारासोबत बाहेर जाण्याची संधी मिळेल. अबोली रंग जवळ बाळगा. शुभ परिधान -अबोलीचा गजरा, सुती रुमाल.

कन्या – अनपेक्षित लाभ
काहीही झाले तरी मनाची शांतता आणि संयम ढळू देऊ नका. कोणतीही गोष्ट शांत डोक्याने करा. गृहिणीने घरातील व्यक्तींसाठी उत्तम स्वयंपाक करावा. त्यामुळे मने बांधलेली राहतील. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित लाभ होतील. तपकिरी रंग महत्त्वाचा. शुभ परिधान-चॉकलेटी टी शर्ट, मोठी पर्स.

तूळ – आर्थिक लाभ
घरातील लहान मुले तुम्हाला व्यस्त ठेवतील. त्यामुळे आनंदात राहाल. विठोबाची उपासना मनोभावे करा. घरातील प्रतिमेला तुलसीपत्र वाहा. खिरीचा नैवेद्य दाखवा. कामाच्या ठिकाणी उत्तम आर्थिक लाभ होतील. नवे काम मिळेल. पांढरा रंग जवळ ठेवा.शुभ परिधान-हिऱयांचा दागिना, पांढरा कुर्ता.

वृश्चिक – आत्मविश्वास वाढेल
जुनी देणी परत येतील. त्यामुळे खुशीत असाल. पण तुम्ही जवळच्या व्यक्तीकडून घेतलेले पैसे परत करून टाका. अन्यथा उगाच गैरसमज वाढतील. नव्या कल्पना अमलात आणाल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. तांब्याचा रंग जवळ बाळगा. शुभ परिधान-तांब्याचे कडे, लाल साडी.

धनु – सकारात्मकता वाढेल
अनाठायी खर्चांना आळा घाला. आध्यात्मिकतेकडे कल झुकेल. त्यात वावगे काही नाही. हरिपाठाचे अभंग ऐका. मन शांत राहील. घरात छोटीशी पूजा करा. सकारात्मक ऊर्जा वाढेळ. कामाच्या ठिकाणी वेळ पाळा. जांभळा रंग जवळ बाळगा.शुभ परिधान-जांभळा पुर्ता, अॅमेथिस्टचा खडा

मकर – व्यावसाय सुधारेल
कामाच्या ठिकाणी सहकार्याचे धोरण ठेवा. त्यामुळे व्यावसायिक सबंध सुधारतील. घरातील कुटुंबीयांची काळजी घ्या. त्यांना तुमची गरज भासेल. योग्य ठिकाणी पैसे खर्च करा. हात आखडता घेऊ नका. या आठवडय़ात पिस्ता रंग जवळ ठेवा.शुभ परिधान -पारंपरिक पोशाख

कुंभ – प्रेमाचा आठवडा
नव्या जबाबदाऱया ताण वाढविणाऱया असतील. मन शांत ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्या. विशेषतः आहाराकडे. बाहेरील खाणे वर्ज्य करा. सात्विक आहार घ्या. नवविवाहितांसाठी प्रेमाचा आठवडा. जोडीदाराला वेळ द्या. पिवळा रंग जवळ बाळगा. शुभ परिधान- डिझायनर घडय़ाळ, सोनसाखळी.

मीन – विवाहयोग आहे
मन सशक्त ठेवलेत तर शरीरही समर्थ राहील. या परस्परांचा सबंध लक्षात ठेवा. कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. नवी ऊर्जा मिळेल. स्वतःकडे लक्ष द्या. मनपसंत जोडीदार मिळेल. विवाहयोग आहे. आलेली संधी दवडू नका. आकाशी रंग जवळ बाळगा. शुभ परिधान- डिझायनर गाऊन, पुरुषांनी मंद सुगंधल